‘NCP ने सरकार पाडलं नसतं तर आरक्षण दिलं असतं’; चव्हाणांनी टाकला मिठाचा खडा

‘NCP ने सरकार पाडलं नसतं तर आरक्षण दिलं असतं’; चव्हाणांनी टाकला मिठाचा खडा

Pruthviraj Chavan On Maratha Reservation : राष्ट्रवादीने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही आरक्षण दिलं असतं, या शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(Pruthviraj Chavan) यांनी खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये कलह सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आमचं सरकार पडलं आणि भाजप सत्तेत आला असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. चव्हाणांच्या आरोपांनतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये टीका-टीप्पणी सुरु आहे. आज मराठा आरक्षणावर बोलताना चव्हाणांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. चव्हाणांच्या या विधानानंतर मराठा आरक्षण वादात मिठाचा खडाच पडल्याचं बोललं जात आहे.

ठाकरेंना नडले, राऊतांना भिडले… पण शिंदेंनी सोडले : टीआरपी घोटाळ्यात अर्णब गोस्वामींना दिलासा

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 2014 साली आमचं सरकार पाडलं गेलं नसतं तर आम्ही आरक्षण दिलं असतं. 2014 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती तुटली म्हणूनच भाजप सत्तेत आली असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात मला जेवढा बदल करता आला तेवढा मी केला. राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. त्याची मोठी राजकीय किंमत मला मोजावी लागली. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले असा खळबळजनक खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधीही केला होता.

Rain Alert : पुणे-नगरकरांनो सावधान! आजही ‘अवकाळी’ बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

पृथ्वीराज चव्हाण यांच्या खुलाश्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखेंनीही चव्हाणांवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. सरकार घालवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. काँग्रेसच्या वाताहतीला पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार आहेत. सत्ता गेल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत आता चव्हाणांना शहाणपण सुचत आहे. पण, यात काहीही तथ्य नाही, अशी टीका मंत्री विखे पाटील यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदेंना वेळ द्या :
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाला हात लावून शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांना वेळ द्यावा. मराठा आंदोलकांनी हिंसक वळण घेऊ नये, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

Ahmednagar News : नगरमध्ये मोठ्ठा घोटाळा! काँग्रेस नेत्याची थेट नांगरे पाटलांकडे तक्रार

दरम्यान, मराठा आरक्षणावरुन राज्यात वादंग पेटलं आहे. मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असतानाच मराठा बांधवांकडून सरकारची कोंडी करण्यात येत आहे. येत्या 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम मराठा बांधवांनी सरकारला दिला आहे. अशातच आमचं सरकार असतं तर आरक्षण दिलं असतं, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी मिठाचा खडा टाकला आहे. त्यामुळे आता चव्हाणांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीसह सत्ताधारी नेते काय भूमिका मांडतील हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube