Ahmednagar News : नगरमध्ये मोठ्ठा घोटाळा! काँग्रेस नेत्याची थेट नांगरे पाटलांकडे तक्रार

Ahmednagar News : नगरमध्ये मोठ्ठा घोटाळा! काँग्रेस नेत्याची थेट नांगरे पाटलांकडे तक्रार

Ahmednagar News : नगर महापालिकेच्या कारभाराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याला राजकीय वरदहस्तातून मनपा अधिकारी, ठेकेदारांच्या संगममताने झालेला कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार, शासकीय निधीचा अपहार जबाबदार आहे. सातशेहून अधिक रस्त्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेत केला. या प्रकरणात आता अँटी करप्शनचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील व नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा धाडगे यांच्याकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती काळे यांनी दिली.

काळेंनी आपल्या तक्रारीत सन २०१६ ते २०२३ मधील ८ आयुक्त यांच्यासह मनपाचे अनेक अधिकारी तसेच ज्या, ज्या शासकीय, निमशासकीय संस्था यांनी बनावट गुणवत्ता चाचणी अहवाल दिले त्या प्रक्रियेशी निगडित सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी काळे यांनी केली आहे. निकृष्ट कामे करणारे बहुतांश ठेकेदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप काळेंनी यावेळी केला आहे. काळे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर महापालिका प्रशासन आणि शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Ahmednagar News : दुग्धविकास खातं असूनही मंत्री विखेंच्या जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी उपोषण

मनपाच्या बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, कचरा संकलन अशा विविध विभागांच्या कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी तसेच नगरसेवकांची आहे. मात्र निकृष्ट कामे कागदोपत्री जिरविण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार केले जातात. बिलं लाटली जातात. या टक्केवारीतून कमावलेला पैसा विधानसभा, मनपा निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी राजकीय नेतृत्व वापरते असा आरोप काळे यांनी केला.

नांगरे पाटलांची भेट घेणार, पुरावे सादर करणार

दरम्यान, 1 डिसेंबर रोजी अँटी करप्शनचे अप्पर पोलीस महासंचालक नांगरे पाटील यांची मुंबई येथे समक्ष भेट घेणार असून याबाबत जलद गतीने सखोल तपास करण्याची मागणी करणार असल्याचे काळे यांनी सांगितले नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक धाडगे यांच्याशी दूरध्वनी वरून बोलणे झाले असून लवकरच नाशिक कार्यालयात समक्ष हजर राहून शेकडो कागदपत्रांचे पुरावे तपास कामी दाखल करणार असल्याचे काळे म्हणाले.

नगरमध्ये शाळेच्या परिसरातच मटक्याचा अड्डा! काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या स्टिंग ऑपरेशन नंतर पोलिसांची कारवाई

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube