Ahmednagar News : दुग्धविकास खातं असूनही मंत्री विखेंच्या जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी उपोषण

Ahmednagar News : दुग्धविकास खातं असूनही मंत्री विखेंच्या जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी उपोषण

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये (Ahmednagar News) दुधाला 34 रुपये भाव मिळावा. या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून अकोले तहसील कार्यालयासमोर दूध उत्पादक शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. सरकारने पाच दिवस उलटूनही उपोषणकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता उपोषणकर्त्यांकडून केला जातो आहे.

राहुलजी, 50 चे झालात, एकटेपणा त्रास देत असेल, कोणीतरी जोडीदार शोधा : औवेसींचा खोचक सल्ला

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पशुसंवर्धन, दुग्धविकास खाते असूनही त्यांच्याच जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना उपोषणाला बसावे लागत आहे. दरम्यान या उपोषणाला साथ देत शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी रविवारपासून बेमुदत अन्नत्याग केले आहे. त्यामुळे मंत्री विखेंच्या जिल्ह्यात शेतकरी आंदोलन पेटणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

Chhagan Bhujbal : ‘नवी वर्णव्यवस्था येतेय, लायकी काढली जाते’; भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा

मंत्री विखेंच्या आदेशानंतरही दरवाढ नाहीच

मंत्री विखे यांच्या उपस्थितीत दूधदरवाढी बाबत एक बैठक पार पडली होती. या झालेल्या बैठकीत दुधाला 34 रुपये भाव दूध कंपन्या आणि दूध संघांनी द्यावा, असा आदेश देखील काढण्यात आला होता. मात्र शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना 26-27 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे सरकारने दूध कंपन्या आणि संघांना 34 रुपये दर देण्यासाठी ठोस पाऊले उचलावी अशी मागणी उपोषणकर्त्यानी केली आहे. या मागणीसाठी अकोले इथे दूध उत्पादन शेतकऱ्यांनी उपोषण आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे.

…तोपर्यंत उपोषण सोडणार नाही

दुधाला 34 रुपये भाव जोपर्यंत मिळत नाही व दूध भेसळ, वजन व मिल्कोमीटर काटमारी, खासगी संस्थांना लागू असणारा कायदा आदी प्रश्नी कार्यवाही केल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती आता बिघडत चालली असून, काहींची शरीरातील साखर पातळी कमी झाल्याने, त्यांना तीव्र अशक्तपणा जाणवत आहे. मात्र, तरीही सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube