Pune Accident Ambadas Danave Allegations on Police and MLA : शहरातील कल्याणीनगर ( Pune Accident ) भागात चार दिवसांपूर्वी मध्यरात्री भरधाव वेगातील पोर्शे (Porsche Car) कारनं दोन आयटी तरूणांचा जीव घेतला. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात देखील या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यात आता ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे ( Aambadas Danave ) यांनी पत्रकार परिषदेमध्ये या घटनेमध्ये सत्ताधारी आमदारांनी दबाव आणला आहे. तसेच पोलिसांकडून व्हाईट कॉलर गुंडांना पोलिसांचं संरक्षण दिलं जात असल्याचा आरोर करण्यात आला आहे.
वेस्ट इंडिजचा चॅम्पियन खेळाडू आता दिसणार अफगाणिस्तानच्या संघात, बजावणार मोठी भूमिका
दानवे म्हणाले की, पुणे अपघातातील श्रीमंत घरातील मुलाला सरकार आणि पोलिसांनी धडा शिकवणे गरजेचे आहे. मात्र या प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने रात्री दोन ते तीनच्या दरम्यान जाऊन पोलिसांवर दबाव आणला आहे का? त्याची चौकशी होऊन गरजेचे आहे. असं राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव न घेता दानवे म्हणाले.
Government Schemes : बचत गट महिला समृध्दी कर्ज योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
त्याचबरोबर एकीकडे पुण्याचे पोलीस आयुक्त इतर गुन्हेगारांवर, गुंडांवर कारवाई करून शो बाजी करतात. मात्र अशा प्रकारच्या व्हाईट कॉलरवाल्यांना पोलिसांकडून संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांवर तात्काळ कार्य करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
तसेच यावेळी दानवे यांनी राहुल गांधींनी या अपघातावर केलेल्या टीकेवर फडणवीसांनी राहुल गांधींना सुनावले त्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी जर या अपघाताचं राजकारण करत असतील तर फडणवीस प्रत्येक विषयात समाजकारण करतात का? तसेच असे विषय देशपातळीवर जाणे गरजेचे आहे. जेणेकरून केंद्र सरकारने केलेल्या वाहतुकीसंदर्भातील कायद्यांची अंमलबजावणी होईल. तर अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या पबवर देखील कारवाईची मागणी दानवे यांनी यावेळी केली.