Download App

Pune : कसबा जिंकण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन रिंगणात

पुणे :  कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा ( Kasaba Byelection )  प्रचार जोरदार सुरु आहे.  या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने ( Hemant Rasane )  हे रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणुक लागली आहे. या निवडणुकीसाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व ज्यांची भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख आहे, असे मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan )  हे रिंगणात उतरले आहेत. त्यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली आहे.

गिरीश महाजन यांच्याबरोबर मंत्री रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आत्तापर्यंतच्या निवडणुक प्रचाराचा आढावा त्यांनी घेतला आहे. या बैठकीसाठी निवडणुक प्रभारी मुरलीधर मोहोळ, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ आदी नेते मंडळी उपस्थित होती.

दरम्यान या निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या तोफा धडकणार आहेत. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड हे केंद्रीय मंत्री सभेसाठी येणार आहेत. तर राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, चित्रा वाघ ही नेते मंडळी प्रचारासाठी येणार आहेत.

Tags

follow us