Prashant Bamb : गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत आमदार बंब यांना धक्का!

Prashant Bamb  :  गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत आमदार बंब यांना धक्का!

औरंगाबाद : गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत महाविकास आघाडीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. महाविकास आघाडीचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली आहे. यामध्ये डोणगावकर यांचा पॅनल जिंकला आहे. निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांना मोठा धक्का बसला आहे.

गंगापूर साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवारी मतदार पार पडलं असून एकूण 54 टक्के मतदान झालं. तर एकूण 21 संचालकांपैकी एक जागा बिनविरोध झाल्याने 20 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात होते.

जगातील सर्वात ‘सेक्सी क्रिमिनल’ | कॅनडाची स्टेफनी ब्युडोइन | stephanie beaudoin

कारखाना निवडणुकीसाठी एकूण 14 हजार 66 मतदार सभासदांपैकी 7 हजार 598 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज सकाळपासून मतमोजणी सुरु होती. बंब यांच्या शेतकरी सभासद कामगार पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे. तर शिवसेनेचे (ठाकरे गट) कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलने संपूर्ण 20 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे बंब यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Mumbai : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी ३९७ कोटी मंजूर, शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या आणि विद्यमान आमदार असून देखील बंब यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात हा निकाल चर्चेचा विषय बनला आहे.

निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होताच, आमदार बंब आणि त्यांचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावरून निघून गेले आहेत. तर डोणगावकर यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरु केला. यावेळी आमचा विजय झाला असल्याचं म्हणत, कृष्णा डोणगावकर यांनी देखील विजयाचा जल्लोष साजरा केला.

दरम्यान, गंगापूर कारखाना बंद आहे तरीसुध्दा या कारखान्याची ही निवडणुकी प्रतिष्ठेची मानली जात होती. यासाठी दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचारही सुरु होता. अखेर आजच्या निकालाकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube