Download App

Pune By-Poll Results 2023 : भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, सदाशिव, नारायण, शनिवार पेठेत काँग्रेसला अभुतपूर्व प्रतिसाद

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे. या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये जोरदार टक्कर आहे. आत्तापर्यंत मतमोजणीच्या अकऱ्या फेऱ्या झाल्या आहेत. रवींद्र धंगेकर यांनी अकराव्या फेरीपर्यंत आपल्या मतदानाचा लीड कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे धंगेकर यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ या पेठांमध्ये आघाडी घेतलेली आहे.

कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेली 25 वर्षे याठिकाणी भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत. यावेळी मात्र याठिकाणी बदल होणार असे काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ या ठिकाणी रासने यांना आघाडी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु याठिकाणी देखील धंगेकर यांना आघाडी मिळाल्याचे पहायला मिळते आहे. आत्तापर्यंत हेमंत रासने यांना 44034 मते आहेत तर रवींद्र धंगेकर यांना 49120 मते आहेत. धंगेकर यांनी या फेरीत 5086 मतांची आघाडी घेतली आहे.

Pune By-Poll Results 2023 : पहिल्या नऊ फेरीत धंगेकर आघाडीवर, रासनेंचे टेंशन वाढले

दरम्यान महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी अनेकांची नावे चर्चेत आली होती. अखेर रविंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट घडला होता. या मतदारसंघासाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपली प्रतिष्ठा पणाला लावण्यात आल्याचं पाहायला मिळालंय.

Kasba By Election : भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर

दरम्यान, अत्यंत चुरशीची मानली जाणाऱ्या या लढतीत कसबा पेठचा गड कोण राखणार? हे अद्याप गुलदस्त्यात असून कसब्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.अद्याप अंतिम निकाल जाहीर झाला नसून 3 वाजेपर्यंत अंतिम निकाल येणार असल्याची शक्यता आहे.

Tags

follow us