Download App

Girish Bapat : व्हील चेअरवर बसून ऑक्सिजनच्या नळकांडीसह गिरीश बापट भाजपच्या प्रचारात

पुणे :  पुण्यातील ( Pune )  कसबा या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा ( Kasaba Byelection )  प्रचार जोरदार सुरु आहे. या प्रचारासाठी आज भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार गिरीश बापट ( Girish Bapat )  हे आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नाही आहे. तरी सुद्धा ते प्रचारात सहभागी झाले आहेत. गिरीश बापट यांनी तब्येत ठीक नसल्यामुळे प्रचारात सहभागी होणार नसल्याचे सांगितले होते. यावरुन बापट नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता बापट हे प्रचारात सहभागी झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी आहेत. तरी सुद्धा त्यांनी पक्षाचा विजय व्हावा म्हणून ते टिळकवाडा येथे प्रचारासाठी आले होते. व्हील चेअरवर बसून ऑक्सिज नळकांडी लावलेल्या अवस्थेत गिरीश बापट प्रचारात सहभागी झाले होते. यावेळी हेमंत रासने यांनी शाल व पुणेरी पगडी देत त्यांचा सत्कार केला आहे. बापट हे गेल्या अनेक काळापासून मोठ्या आजाराला तोंड देत आहेत. अशा परिस्थितीत देखील ते प्रचारासाठी आले आहेत.

दरम्यान  गिरीश बापट हे कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे या भागात त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. बापट नाराज असल्याच्या चर्चेचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे आता थेट गिरीश बापट स्वत: या पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत.

 

Tags

follow us