Download App

Pune : मतदानाच्या दिवशीच मी लीडचा आकडा सांगणार : धंगेकर

पुणे : पुण्यातील कसबा ( Kasaba ) विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे.  भाजपच्या कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak )  यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक लागली आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे या निवडणूकीत भाजपकडून हेमंत रासने ( Hemant Rasane)  यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar )  हे रिंगणात आहेत. या निवडणुकीत आपलाच विजय होणार, असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

मी गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरात काम करतो आहे. प्रत्येक जाती धर्माचा माणूस माझ्या ऑफिसमध्ये येतो. कुणाचीही जात अथवा धर्म पाहून मी काम करत नाही. प्रत्येकाला समान न्याय देण्याचे माझे काम असते. त्यामुळे या निवडणुकीत मीच विजय होणार. तुम्हाला निकालाच्या दिवशी लीड सांगेल, असा दावा धंगेकर यांनी केला आहे.
तसेच त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावरही टीका केली आहे. हेमंत रासने यांचे आव्हान मला काही वाटत नाही. गेल्या चार वर्षांमध्ये पुणे महानगरपालिका लुटण्याचे काम यांनी केले आहे. हा सर्व भ्रष्टाचार आम्ही समोर आणणार आहोत, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

 

दरम्यान या निवडणुकीतून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब धाबेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यासाठी त्यांना राहुल गांधींनी फोन केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच संभाजी ब्रिगेड व आम आदमी पक्षाने देखील कसबा पोटनिवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Tags

follow us