LetsUpp Exclusive : खडसेंची गुगली…आणि गिरीशभाऊंची अडचण

LetsUpp Exclusive : खडसेंची गुगली…आणि गिरीशभाऊंची अडचण

प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी)

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गिरीश महाजन यांचे पूर्वाश्रमिचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाजन हे भावी मुख्यमंत्री असे म्हणत खडसे यांनी महाजन यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत. असे असताना गिरीश महाजन यांना प्रमोट करुन दोघात संशय निर्माण होईल असा हा प्रयत्न होता का असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे. पण खडसे यांचा पक्षांतर्गत अभ्यास पाहता याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

या राज्यात सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येऊ शकते. भाजप सत्तेपासून दूर राहणार असं भाकित भाजपमध्ये असताना करण्यात आले होते. पण त्याकाळी खडसे नाराज असल्याने असे विधान करत असतील असा बचावात्मक पवित्रा भाजपने घेतला होता, पण महाआघाडी सरकार सत्तेत आल्यानतंर हे भाकित खरे ठरले आहे.

आतही खडसे यांच्या विधानामागे भाजपच्या अंतर्गत घडमोडीचा संदर्भ आहे का ? याकडे पाहिल जात आहे. खडसे यांच्या शुभेच्छा मला लाभत नाहीत. त्यामुळे त्या शुभेच्छा नकोत असे गिरीश महाजन यांनी सांगितल आहे.

खडसे यांनी केलेलं विधानामागे मला अडचणीत आणाव असं दिसतय. त्यामुळे मी जिथे आहे तिथे बरा आहे. भाजपात मागून आणि इच्छा व्यक्त करुन काही मिळत नाही, हे लक्षात असेल असा टोलाही महाजन यांनी खडसे यांना लगावला आहे. आगामी काळात खडसेंच्या शुभेच्छांचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube