Radhakrishna Vikhe Patil : काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. घटनेला 23 दिवस उलटून गेल्यानंतरही या प्रकरणातील काही आरोपी अद्याप आहेत. तर दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराड (Walmik Karad) याने सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं. दरम्यान, कराड याचे मंत्री धनंजय मुंडेंशी (Dhananjay Munde) जवळीकता असल्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी यावर भाष्य केलं.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलतांना अनेक विषयांवर भाष्य केलं. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, बीड हत्या प्रकरणात सध्या कायदेशीर कारवाई सुरू आहे. एसआयटी चौकशीचा अहवाल येऊ द्या, अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
Dulal Sarkar : ममता बॅनर्जीच्या जवळच्या नेत्याला गोळ्या झाडून संपवलं…
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येतील, अशी चर्चा सुरू आहे. दोन्ही पवार एकत्र यावे यासाठी अजित पवार यांच्या मातोश्रींनी विठुराणा चरणी साकडे घातले. याविषयी विचारलं असता विखे म्हणाले की, दोन पवार एकत्र यावे न यावे हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, कोणी काय साकडे घालावे त्यांची इच्छा, असं विखे म्हणाले.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या खात्यांच्या वाटपावर कोणीही नाराज नाही, जलसंपदा खाते विभागून दिल्याने माझी नाराजी नाही, या खात्यात काम करण्यास भरपूर वाव आहे, नदीजोड प्रकल्प, तसेच तुटीचे गोदावरी खोरे यात कामाला चांगला वाव आहे, असं ते म्हणाले.
महानगरपालिका निवडणुका एकत्र लढणार
आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याच्या चर्चांवर बोलताना विखे म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील युती कायम राहणार आहे.
पोलीस खातं पूर्णपणे करप्ट – आंबेडकर
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यावरून प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे, नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही, अशी टीका आंबेडकरांनी केली.