फडणवीसांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही, संपूर्ण खातं करप्ट…; बीड हत्या प्रकरणावरून आंबेडकर संतापले
Prakash Ambedkar : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीने हाती घेतला आहे. तर दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) याने पुण्यात सीआयडी (CID) मुख्यालयात आत्मसमर्पण केले. या हत्येतील आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि कृष्णा आंधळे हे अद्याप फरार आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला.
आता काश्मीरचे नावही बदलले जाणार? अमित शाह यांनी दिले संकेत, सूचवलं ‘हे’ दुसरं नाव….
देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे, नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही, अशी टीका आंबेडकरांनी केली.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात रोज नवनवे आरोप-प्रत्यारोप होत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आंबेडकरांनी या लिहिलं की, देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्य प्रकरणी पहिल्यांदा स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. त्यांना देशमुख हत्येप्रकरणी काही सापडले नाही. त्यानंतर पोलीस अधिक्षकांनी चौकशी केली, त्यांना काही सापडले नाही. त्यानंतर CID ने चौकशी केली, त्यांनाही काही सापडले नाही. आणि आता चौकशीसाठी SIT स्थापन केली आहे. पुढे काय करणार ? ही केस CBI ला देणार का? असा सवाल आंबेडकरांनी केला.
तुम्ही मंत्रिमंडळात ‘इन’ होणार का? भुजबळांचे मोठं विधान, म्हणाले, ‘फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द…’
पुढं ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे करप्ट झाले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही. ज्यांनी या प्रकरणाचा तपास योग्य केला नाही, त्यांना विचारा की तपास का झाला नाही ? याचे उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा, अशी मागणी आंबेडकरांनी केली.
दरम्यान, बीड सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराड आणि अजित पवार यांच्याबाबत मोठा दावा केलाय. अजित पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी मस्साजोग इथे गेले असता, त्यांच्या ताफ्यात वाल्मीक कराडची देखील गाडी होती, असं सोनवणे म्हणालेत. त्याच गाडीतून त्याने पुण्यात सरेंडर केलं, असा दावाही सोनवणे यांनी केला.