आता काश्मीरचे नावही बदलले जाणार? अमित शाह यांनी दिले संकेत, सूचवलं ‘हे’ दुसरं नाव….
Amit Shah : आता काश्मीरचे (Kashmir) नाव बदललं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात याबाबत सूचक विधान केलं. काश्मीरचं नाव कश्यप असू होऊ शकतं, असं शाह यांनी म्हटले आहे. ते ‘J&K and Ladakh Through the Ages’ या पुस्तक प्रकाशन प्रसंगी बोलत होते.
बारा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जयश्री भोज धनंजय मुंडेंच्या खात्याच्या सचिव
यावेळी बोलतांना शाह म्हणाले की, काश्मीरचं नाव कश्यपपासून असू शकतं. शंकराचार्य, सिल्क रूट आणि हेमिश मठ याच्यावरून हे सिद्ध होतं की, भारतीय संस्कृतीचा पाया काश्मीरमध्ये घातला गेला. इथं सुफी आणि बौद्ध संस्कृतीही खूप चांगल्या पद्धतीने रुजली गेली.
काश्मिरी, डोगरी, बाल्टी, झंस्कारी या भाषांना सरकारने मान्यता आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदींचे काश्मीरमधील संस्कृती आणि भाषांकडे विशेष लक्ष आहे. त्यांनी काश्मीरमधील स्थानिक भाषा जिवंत ठेवल्या पाहिजेत आणि त्यांचे जतन केले पाहिजे यावर भर दिल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
तुम्ही मंत्रिमंडळात ‘इन’ होणार का? भुजबळांचे मोठं विधान, म्हणाले, ‘फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द…’
पुढे बोलताना ते म्हणाले की, कलम 370 आणि 35A हे देशाच्या एकात्मतेतील सर्वात मोठे अडथळे आहेत. या कलमांमुळेच दहशतवाद फोफावला होता, मात्र ते हटवल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता वाढली आहे, असे ते म्हणाले. कलम 370 हटवण्यात आल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये विकासाची नवी लाट आली आहे. अनेक विकास प्रकल्प येथे सुरू आहेत, असंही शाह म्हणाले.
काश्मीरचा इतिहास पुस्तकाच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे, ज्याच्या सीमा संस्कृती आणि परंपरेवर आधारित आहेत. त्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत एक आहे. जर भारताला समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम तेथील संस्कृती आणि परंपरा समजून घ्याव्या लागतील, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. याचे ऐतिहासिक पुरावे या पुस्तकात दिले आहेत. काही लोकांनी काश्मिरला वेगळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता तो अडथळाही हटवण्यात आला. काश्मीरमध्ये जी मंदिरं मिळाली आहेत, त्याचा उल्लेख पुस्तकात आहे, त्यामधून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे दिसून येते, असं शाह म्हणाले.
आपला देशाला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांना तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, चुकीच्या इतिहासाची मांडणी करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केल्याचा आरोपही शाह यांनी केला.