तुम्ही मंत्रिमंडळात ‘इन’ होणार का? भुजबळांचे मोठं विधान, म्हणाले, ‘फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द…’
Chhagan Bhujbal : अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यामुळे भुजबळांनी अनेकदा जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरूवात झाली. फडणवीसांनी भुजबळांना मंत्रिपदाचा शब्द दिल्याचं बोलल्या जातयं. दरम्यान, यावर आता भुजबळांनी भाष्य केलं.
पालकमंत्री ताई अन् भाऊ कोणीही असो फरक नाही पडत; बजरंग सोनवणेंनी क्लिअर सांगितलं
देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, असं भुजबळ म्हणाले.
फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ काही दिवसांसाठी परदेश दौऱ्यावर गेले होते. ते आज परदेश दौऱ्यावरून परतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना भुजबळांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकती काय चर्चा झाली होती? फडणवीस यांनी मंत्रिपदाचा शब्द दिला होता का? असा सवाल भुजबळांना केला असता ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रीपदाचा कोणताही शब्द दिला नव्हता.
कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माचे ‘हे’ 5 मोठे विक्रम, अजून कोणीच मोडू शकलेलं नाही
फडणवीस मला मंत्रिपदाबद्दल काहीही बोलले नाहीत. त्यांनी फक्त 7 ते 10 दिवस थांबा, नंतर चर्चा करू एवढचं सांगितलं. मला मंत्री करणार किंवा आणखी काही जबाबदारी देणार असं काहीही बोललेले नाहीत, असं भुजबळ म्हणाले.
मनधरणीसाठी कोणाचेही फोन आले नाहीत
मंत्रिमंडळातून डावल्यानंतर भुजबळ यांनी जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना, असं सूचक वक्तव्य करत बंडाचे संकेत दिले होते. त्यामुळं नाराज भुजबळांचे मनधरणीचे प्रयत्न केले जात आहेत, असे वृत्त प्रसारित झाले होते. यावर बोलतांना ते म्हणाले की, मला मनधरणीसाठी कोणाचेही फोन आले नाहीत आणि आले तरी मी तुम्हाला सांगणार नाही. मात्र, मी पूर्णवेळ थोडे दिवस राजकारणातून डोकं बाजूला काढलं होतं. आयुष्यभर राजकारण केले. त्यामुळे थोडावेळ डोक्याला राजकीय आराम द्यावा लागतो, असं भुजबळ म्हणाले.