Download App

विखे-थोरातांमध्ये आता नवा सामना; खताळांनाबरोबर घेऊन’गणेश’चा बदला घेणार

संगमनेरमधील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची तयारी विखे खताळांकडून सुरू

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe-Amol Khatal deal another blow to Balasaheb Thorat : गेली अनके वर्षे एकहाती सत्ता मिळविणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasheb Thorat) यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. थोरातांचे परंपरागत राजकीय विरोधक मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या पाठबळाने शिवसेनेचे अमोल खताळ (Amol Khatal) यांनी थोरातांचा पराभव केला. मात्र आता या निवडणुकीनंतर विखे – खताळ यांच्याकडून पुन्हा एकदा थोरात यांना कोंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे. येणाऱ्या काळात संगमनेरमधील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्याची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून थोरातांचे वर्चस्व असणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना धक्का देण्याची तयारी विखे-खताळांनी केलीय. यामुळे येणाऱ्या काळात विखे-खताळांची जोडी थोरातांना शह देण्यासाठी जोरदार तयारीत आहे.

Video : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, ई-बाईक टॅक्सीला परवानगी; दहा हजारांचं अनुदानही मिळणार

विखे-थोरात संघर्ष हा टोकाला गेलेला आहे. दोन वर्षांपूर्वी राहाता तालुक्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विवेक कोल्हे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकत्र येत विखेंना धक्का दिला होता. विखे पाटील यांच्या जनसेवा पॅनलचा दारून पराभव करत कारखाना हिसकावून घेतला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या. यामध्ये नगर दक्षिणेमध्ये सुजय विखे यांचा आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभव केला. विखेंच्या पराभवासाठी व लंकेच्या मदतीसाठी बाळासाहेब थोरात हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढण्यासाठी विखे पूर्ण तयारीनिशी उतरले होते. कधीही पराभूत न झालेल्या थोरातांसाठी विखेंनी जोरदार तयारी केली. शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांना पाठिंबा व राजकीय ताकद देत विखेंनी संगमनेरमध्ये थोरातांना पराभवाची धूळ चाखवत खताळ यांना विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

योगींच्या बुलडोझर पॅटर्नला सुप्रीम कोर्टाचा दणका! घरं पाडलेल्यांना द्यावे लागणार 10 लाख

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता पुन्हा एकदा थोरातांना कोंडीत गाठण्यासाठी विखे-खताळांची जोडी पुन्हा मैदानात उतरलीय. संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी उडणार आहे. विधानसभेत बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला विखेंनी उद्धवस्त केला. आता त्यांचे वर्चस्व असणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्याच्या निवडणुकीत थोरातांना धक्का देण्याची तयारी विखे-खताळांनी केलीय.


ही निवडणूक फक्त लढायची नसून, जिंकायचीः अमोल खताळ

संगमेनरचे आमदार अमोल खताळ यांनी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. या बैठकीत त्यांनी शेतकरी, सभासदांच्या मालकीचा कारखाना काही जणांनी प्रायव्हेट लिमिटेड केला. आता हा कारखाना पुन्हा एकदा सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी पूर्ण ताकद लावण्याचे आवाहन त्यांनी केले. ही निवडणूक फक्त लढायची नसून जिंकायची असल्याचे सांगत आमदार खताळांनी दंड थोपटले आहेत.

follow us