योगींच्या बुलडोझर पॅटर्नला सुप्रीम कोर्टाचा दणका! घरं पाडलेल्यांना द्यावे लागणार 10 लाख

Supreme Court hits Yogi Aditynath bulldozer will have pay to Those houses demolished : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पदभार स्विकारल्यापासून त्यांना आणखी एकाी नावाने ओळखले जाऊ लागले आहे. ते म्हणजे बुलडोझर बाबा याचं कारण म्हणजे त्यांनी गुन्हेगारांच्या घरांवर थेट बुलडोझरने केलेल्या पडाझडीच्या कारवाया. मात्र आता यावर योगी सरकारला थेट सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. तसेच या सर्व कारवाया केलेल्या लोकांना प्रत्येकी 10 लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
मोठी बातमी! ई-बाईक टॅक्सीला परवानगी; राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत निर्णय, दहा हजारांचं अनुदानही मिळणार
यावर बोलताना कोर्टाने म्हटले की, उत्तर प्रदेश सरकारकडून प्रयागराजमध्ये केलेल्या बुलडोझर कारवाया या असंविधानिक आणि अमानवीय आहेत. यामुळे सद्सद् विवेक बुद्धीला धक्का बसला आहे. निवाऱ्याचा हक्क आणि कायद्याचं पालन करायला हवं. असं म्हणत जस्टिस एएस ओका आणि जस्टिस उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने आदेश दिला आहे की, या सर्व कारवाया केलेल्या लोकांना प्रत्येकी 10 लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
तर कोर्टाने पुढे म्हटले की, कोणत्याही कायद्याचं पालन नकरता ही कारवाई करण्यात आली आहे. कारण ही कारवाई झालेल्या लोकांनी सांगितले की, त्यांना याची केवळ एक दिवस अगोदर नोटीस दिली. तसेच या कारवाई करण्यात आलेल्या लोकांवर त्यांना गॅंगस्टर अतिक अहमद यांच्या संबंधित समजून कारवाई करण्यात आली आहे.