Video : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, ई-बाईक टॅक्सीला परवानगी; दहा हजारांचं अनुदानही मिळणार

Video : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, ई-बाईक टॅक्सीला परवानगी; दहा हजारांचं अनुदानही मिळणार

State Cabinet Subsidy To E-bike taxis : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय झालाय. ई-बाईक टॅक्सीला (E-bike taxis)  परवानगी देण्यात आलीय. सोबतच दहा हजार रूपयांचं अनुदान मिळणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय झालाय.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज रोजी झालेल्या बैठकीत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आलीय. बाईक टॅक्सीला परवानगी देत असताना या बाईक टॅक्सीला नियमांच्या आधीन राहून काम करावे लागणार असल्याचं समोर येतेय. यामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं आहे.

गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं! सेन्सेक्स धडामधूम…निफ्टी 23,150 च्या आसपास, ‘हे’ शेअर्स सर्वात जास्त घसरले

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय की, पावसाळ्यात कव्हर असलेल्या बाईक टॅक्सीलाच परवानगी मिळेल. सोबतच पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार नाही, असं देखील प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय. तर एका संस्थेला केवळ 50 बाईक टॅक्सी चालविण्याची परवानगी मिळणार आहे.

Gujrat : फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग; 17 जण होरपळले, ढिगाऱ्याखाली कामगार अडकले

जीपीएस यंत्रणा आवश्यक

बाईक टॅक्सीत जीपीएस यंत्रणा आवश्यक आहे. तर बाईकस्वाराच्या पाठी बसणाऱ्याला देखील हेल्मेट बंधनकारक आहे. या बाईकच्या नोंदणी क्रमाकांची (नंबर प्लेट) पाटी पिवळ्या रंगाची असून बाईक टॅक्सीमधील दुचाकीसाठी विशिष्ट रंग ठरवण्यात येणार आहे.

बॅचची सक्ती

बाईक टॅक्सी चालकाला बॅचची सक्ती असून हा बॅच परिवहन विभाग नोंदणी करून देईल. पोलीस पडताळणीत करूनच चालक परवाना बॅच मिळणार असल्याचे समोर येत आहे. महिलांसाठी खास महिला बाईक रायडर असावेत अशी सूचना संबंधित बाईक टॅक्सी सेवा देणार्‍या कंपनीस देण्यात येतील.

परिवहन विभागाच्या माध्यमातून ई- बाईक टॅक्सीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरता ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी ई- बाईक टॅक्सीला महाराष्ट्रामध्ये परवानगी दिलेली आहे. सिंगल व्यक्तीला खाजगी वाहनांना दुप्पट तिप्पट जे भाड द्यावं लागतं होतं, ते न देता आता ई- बाईक टॅक्सीच्या माध्यामांतून प्रवाश्यांना पुर्ण महाराष्ट्रात बाईक टॅक्सीचा प्रवास कुठेही करता येईल.

पावसाळ्यात कव्हर बाईक

15 किलोमीटरपर्यंत अंतर मर्यादीत ठेवलेलं आहे. 50 बाईक एकत्र घेणाऱ्या संस्थेला ती परवानगी देण्यात येईल. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली नियमावली तयार केलेली आहे. पावसाळ्यात सुरक्षित प्रवास होण्यासाठी कव्हर बाईक, ई-टॅक्सी उपलब्ध करुन दिली जाणार आहे, हे धोरण राज्यशासनाने ठरवलेलं आहे. प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही खुप उपाय योजना केलेल्या आहेत.

कमीत कमीत पैशात सुविधा

फक्त इलेक्ट्रिक वाहनांना प्रमोट करण्याच्या दृष्टीकोनातून ई- बाईक, टॅक्सी ला परवानगी दिलेली आहे. महाराष्ट्र प्रदुषण मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे, ही त्याची सुरुवात आहे. प्रवाश्यांना कमीत कमीत पैशात सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. ई बाईक टॅक्सी जर रिक्षावाल्यांच्या मुला-मुलीने घेतली, तर त्यामध्ये 10 हजार रुपये आम्ही अनुदान देणार आहोत. दहा हजार पेक्षा जास्त रोजगार मुंबईत निर्माण होतील आणि महाराष्ट्रात 20 हजार निर्माण होतील, असं देखील स्पष्ट करण्यात आलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube