‘सारथी’ला 122 कोटी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटींचा निधी मंजूर; विखे पाटलांनी दिली माहिती

Radhakrishna Vikhe Patil on Sarthi: सारथी संस्थेला 122 कोटी 34 लाख आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर.

Radhakrishna Vikhe Patil on Sarthi And Annasaheb Patil Mahamandal Fund

Radhakrishna Vikhe Patil on Sarthi And Annasaheb Patil Mahamandal Fund

Radhakrishna Vikhe Patil on Sarthi And Annasaheb Patil Mahamandal Fund: “छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला (सारथी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 122 कोटी 34 लाख आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या कामाला मोठी गती मिळणार आहे,” अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

डोश्यात चक्क मृत उंदीर! बोरीवलीतील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार, ग्राहकाला उलट्या, कारवाईची मागणी

‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून मराठा, कुणबी आणि मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध शैक्षणिक तसेच सामाजिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि शैक्षणिक शिष्यवृत्तीचा खूप मोठा लाभ विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत आहे.

विखे पाटील म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने ‘सारथी’ संस्थेला नेहमीच भरीव निधी दिला आहे. याच अनुषंगाने संस्थेच्या भव्य वसतिगृहांच्या बांधकामासाठी 122 कोटी 34 लाख 60 हजार रुपयांच्या निधी मंजुरीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

कौटुंबीक वाद पेटला अन् सावत्र मुलानं वडिलांवर झाडली गोळी, पाच जणांविरोधात गुन्हा

राज्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आठ भव्य विभागीय वसतिगृहांच्या उभारणीचे काम आता पूर्णत्वास जात आहे. 500 विद्यार्थी व 500 विद्यार्थिनी अशा एकूण 1,000 विद्यार्थी क्षमतेचे हे वसतिगृह असणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही सर्व वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष सेवेत उपलब्ध होतील, अशा दृष्टीने जलदगतीने नियोजन करण्यात येत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

तरुण उद्योजकांना बिनव्याजी कर्ज पुरवठा करणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबाबत माहिती देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, महामंडळासाठी तब्बल 750 कोटी रुपयांची भरीव अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. यापूर्वी महामंडळाला 450 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. आता नव्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महामंडळास आणखी 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील मराठा समाजातील तरुणांच्या व्यावसायिक स्वप्नांना आणि नवउद्योजकांना मोठे बळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version