पवार म्हणाले, भाकर फिरवली पाहिजे मात्र त्यांनी निर्णय फिरवला…विखेंचा खोचक टोला

Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत त्यांनी घेतलेला निर्णय मागे घेतला. दरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवृत्तीच्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा देखील झाल्या. आता याच मुद्द्यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]

Untitled Design   2023 05 06T154249.088

Untitled Design 2023 05 06T154249.088

Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत त्यांनी घेतलेला निर्णय मागे घेतला. दरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवृत्तीच्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा देखील झाल्या. आता याच मुद्द्यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले होते की भाकर फिरवली पाहिजे. मात्र त्यांनी आपल्या सवयीप्रमाणे आपला निर्णय फिरवला आहे, अशा शब्दात विखे यांनी पवारांना निशाणा साधला आहे.

राज्याचे महसूलमंत्री तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे अहमदनगरमध्ये (Ahmednagar) बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पवार यांचा राजीनामा तसेच उद्धव ठाकरे यांचा बारसू दौऱ्यावर जोरदार टीका केली. पवार म्हणाले, शरद पवार यांनी 2 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र काल (5 मे) रोजी त्यांनी घेतलेला निर्णय मागे घेतला व अध्यक्षपदी विराजमान झाले. यावर मंत्री विखे यांना विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देत असताना विखे म्हणाले, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र पवार यांनी म्हटलं होतं की भाकर फिरवली पाहिजे. मात्र त्यांनी आपल्या सवयीप्रमाणे निर्णय फिरवला आहे. अशा शब्दात विखेंनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून राज्यात वातावरण चांगलेच चिघळले आहे. प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने येथे मोठा संघर्ष देखील झाला. त्यानंतर या ठिकाणी आता नेतेमंडळी स्थानिकांशी भेट घेत परिस्थिती जाणून घेत आहे. यातच या ठिकाणी आज उद्धव ठाकरे यांनी देखील भेट दिली. यावर मंत्री विखे यांनी भाष्य केले आहे.

नगरकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत

विखे पाटील म्हणाले की, नाणारच्या वेळी त्यांची वेगळी भूमिका होती, आता वेगळी भूमिका आहे. त्यांची भूमिका नेहमीच बदलत असते. मात्र स्थानिकांच्या काय भावना आहेत याबाबत सरकार त्यांच्याशी चर्चा करत आहे. बारसू प्रकरणाला विनाकारण राजकीय हवा देण्याचा प्रकार होत असल्याचा राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Exit mobile version