Download App

बच्चू कडूंनी विश्वासघात केला, त्यांना पुन्हा महायुतीत घेऊ नका…; राधाकृष्ण विखेंची मागणी

बच्चू कडू यांच्यासारखे लोक महायुतीत नको, असं विखे म्हणाले. तसेच बेताल वक्तव्ये करणाऱ्या सर्वच नेत्यांना महायुतीने दूर ठेवावे, असेही विखे म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe Patil : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कड (Bachchu Kadu) यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाणार की, महायुतीसोबत (Mahayuti) जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी बच्चू कडूंबाबत मोठं विधान केलं. बच्चू कडू यांच्यासारखे लोक महायुतीत नको, असं विखे म्हणाले. तसेच बेताल वक्तव्ये करणाऱ्या सर्वच नेत्यांना महायुतीने दूर ठेवावे, असेही विखे म्हणाले.

अचानक ७६ लाख मतांची वाढ कशी झाली?, पटोलेंच्या प्रश्नांवर EC कडून स्पष्टीकरण, ‘संध्याकाळी 6 नंतरही…’ 

विखे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. बच्चू कडू यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, बच्चू कडू यांना महायुती सरकारने पाठबळ दिले. त्यांचे दिव्यांग धोरण मान्य केलं. तरीही त्यांनी सरकारशी प्रतारणा करून विश्वासघात केला. त्यामुळे त्यांना पुन्हा महायुतीत सामील करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही. साहजिकच हा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. पण बच्चू कडू यांच्यासारख्या बेताल, बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा घेतले जाईल, याची शक्यता कमीच वाटते. सरकारचे पाठबळ घेऊन सरकारचाच विश्वासघात करणारे बच्चू कडू असतील किंवा अन्य कुणीही असेल त्यांना पुन्हा महायुतीती घेऊ नये, अशी आमची मागणी आहे, असं विखे म्हणाले.

नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार नाहीत; शिंदेंच्या विश्वासू नेत्याचा दावा 

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता ठाकरे गटाने आगामी निडवणुका स्बळावर लढण्याची भूमिका घेतली. याविषयी विखे पाटील म्हणाले की पराभवानंतर एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू आहे. जनाधार राहिला नाही, हे विरोधकांनी मान्य करायला हवे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याबाबत अनेक बेताल वक्तव्ये केली आहेत, त्याची शिक्षा त्यांना जनतेनं दिल्याचं विखे म्हणाले.

विखेंनी यावेळी आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष देणाऱ्यांवर शरसंधान साधले. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मविआला घवघवीत यश मिळाले, महायुतीची पिछेहाट झाली होती, त्यावेळी ईव्हीएमबाबत शंका का व्यक्त केली नाही? ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी राजीनामा देऊन टाकायला हवा होता. निवडणूक नाकारायला हवी होती. जनमत बाजूने असेल तर ईव्हीएम चांगले आणि विरोधात गेलं तर ईव्हीएम वाईट, असं विरोधकांचे धोरण असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं.

 

follow us