Download App

‘त्या’ लॅम्बोर्गिनी गाडीच्या काचा खाली घेतल्या असत्या तर…’; राधाकृष्ण विखेंचा रोहित पवारांवर पलटवार

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe Patil On Rohit Pawar : गेल्या आठवड्यात मंत्रालयात एक काळ्या रंगाची आलिशान लॅम्बोर्गिनी गाडी (Lamborghini car) आली होती. विशेष म्हणजे, या लॅम्बोर्गिनी गाडीची चेकिंग न ही गाडी थेट मंत्रालयाच्या (Ministry) पोर्चमध्ये गेली होती. या गाडीतील व्हिआयपी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे आल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. आमदार रोहित पवा (Rohit Pawar) यांनी लॅम्बोर्गिनीचे मालक कुमार मोरदानी नावाची व्यक्त असल्याचं सांगत ही व्यक्ती राधाकृष्ण विखेंकडे आल्याचं सूचक विधान केलं होतं. यावर आता खुद्द विखेंनी भाष्य केलं.

चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश! शिवसेना अन् भाजपच्या ‘त्या’ माजी नगरसेवकांमध्ये दिलजमाई

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. रोहित पवारांचे आरोपांविषयी विचारले असता ते म्हणाले, लॅम्बोर्गिनी गाडी आली तेव्हा आमची सह्यादी अतिथी गृहावर आढावा बैठक सुरू होती. लॅम्बोर्गिनी गाडीत कोण आलं? याची माहिती न घेता ही गाडी विखे पाटलाकडे आली, अशा बातम्या चालवल्या गेल्या. माझ्या आजपर्यंतच्या जीवनात असं कधी झालं नाही. मंत्रालयात अनेक गाड्या येतात. ही गाडी माझ्याकडे आली हे कसं? हे कसं सांगता येईल? आधी चौकशी करायला हवी होती. माझ्यावर राजकीय हेतूने आरोप केले जात आहे. त्यात तथ्य नाही. गाडीच्या काळ्या काचा होत्या, असं म्हणत होते. काचा खाली करून बघायला पाहिजे होतं. कदाचित रोहित पवार त्यात दिसले असते, असा पलटवार त्यांनी रोहित पवारांवर केला.

मोठी बातमी! न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची बीसीसीआय लोकपाल म्हणून नियुक्ती 

रोहित पवार यांचा आरोप काय आहे?

मंत्रालयात आलेल्या लॅम्बोर्गिनीवरून रोहित पवारांनी गंभीर आरोप केले होते. त्यांनी एक्सवर एक पोस्ट करत म्हटलं होतं की, व्यक्ती महागडा असला की सिस्टम कशी झुकते याचे ज्वलंत उदाहरण मंत्रालयातील काळी गाडी. या काळ्या गाडीच्या मालकाचे नाव आहे कुमार मोरदानी. आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. ज्या प्रकल्पासाठी ग्राहकांनी १९ कोटी रुपये दिले होते, ज्या प्रकल्पासाठी बँकांनी २०२ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, ते पैसे त्या प्रकल्पासाठी न वापरता २२१ कोटीपैकी १९६ कोटी रुपये दुसरीकडेच वळवले होते. शिवाय प्रकल्पाला ६ मजल्यांची परवानगी असतांना १३ मजले बांधले आणि रेरा कायद्याचे उल्लंघनही केले, असा आरोप रोहित पवारांनी केली.

दरम्यान, काचा खाली करून बघायला पाहिजे होतं, काचा खाली केल्या असत्या तर गाडीत आमदार रोहित पवार हेच दिसले असते, असा टोमणा विखेंनी लगावला. यावर आता आता रोहित पवार काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us