चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश! शिवसेना अन् भाजपच्या ‘त्या’ माजी नगरसेवकांमध्ये दिलजमाई
Chandrakant Patil : शिवसेना गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे (Nana Bhangire) आणि भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या शिवसेना (उबाठा) गटातील माजी नगरसेवक विशाल धनवडे (Vishal Dhanwade) यांची मकर संक्रांत पर्वात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलजमाई झाली.
मोठी बातमी! न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची बीसीसीआय लोकपाल म्हणून नियुक्ती
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातील पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाहोता. काहीच दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विशाल धनवडे, प्राची आल्हाट, बाळा ओसवाल, संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेने महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच पाचही नगरसेवकांच्या जागांवर दावा केला होता. त्यामुळे पुण्यात महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता होती. दरम्यान, आज नाना भानगिरे आणि विशान धनवडे यांच्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलजमाई घडवून आणली.
Take It Easy Urvashi : टेक इट इझी उर्वशी चित्रपटाचा श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणार प्रीमियर
देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असताना राज्यातील महायुतीच्या घटक पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये एकवाक्यता असून, आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र असल्याचे मत यावेळी चंद्रकांत यांनी यावेळी व्यक्त केले.
तर माजी नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले की, खरी शिवसेना कोणती याबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर अनवधानाने उद्धव ठाकरे असे उत्तर दिले गेले. त्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. महायुतीतील आम्ही सर्वच पक्ष एकदिलाने काम करत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबद्दल आमच्या सर्वांच्या मनात नितांत प्रेम, आदर आणि विश्वास आहे.
शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे म्हणाले, धनवडे यांनी केलेल्या खुलाशानंतर आमच्या मनात त्यांच्याबद्दल किंवा भाजपमध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या शिवसेना (उबाठा) नगरसेवकांबद्दल कोणताही आक्षेप नाही. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वडिलकीच्या नात्याने आमची एकत्र भेट घडवून आणली, त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. पुणे शहराच्या विकासासाठी या पुढील काळात आम्ही महायुती म्हणून एकदिलाने काम करणार आहोत, असं भानगिरे म्हणाले.