ही तर पवारांची राजकीय खेळी, शेतकरी नेत्याची पवारांवर टीका…

शरद पवारांच्या निर्णयामागे राजकीय गणितं दडलेली असतात, पवारांचा हा निर्णय राजकीय खेळी असल्याचा खोचक टोला शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. मुंबईत एका कार्यक्रमात बोलतांना शरद पवारांनी त्यांचा हा निर्णय सांगितला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. काँग्रेसला शरद पवारांची गरज का? […]

Raghu

Raghu

शरद पवारांच्या निर्णयामागे राजकीय गणितं दडलेली असतात, पवारांचा हा निर्णय राजकीय खेळी असल्याचा खोचक टोला शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. मुंबईत एका कार्यक्रमात बोलतांना शरद पवारांनी त्यांचा हा निर्णय सांगितला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

काँग्रेसला शरद पवारांची गरज का? बाळासाहेब थोरातांनी सांगितले कारण

अनेक मित्र पक्षांनी शरद पवारांनी हा निर्णय मागे घेण्यासंबंधी म्हटलं तर दुसरीकडे रघुनाथदादा पाटील यांनी शरद पवारांच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे. पाटील म्हणाले, शरद पवार यांचा हा निर्णय म्हणजे राजकीय खेळी आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयानंतर आता त्यांचे चेले त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी ते आंदोलन करतील, असंही स्पष्ट केलंय.

शरद पवार यांनी जो निर्णय घेतला तो निव्वळ राजकीय स्टंटबाजी असून शरद पवार यांचा स्वभाव पाहता आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो राजकीय हेतूने घेतला असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आता त्यांच्या या निर्णयानंतर त्यांचे चेले आता आंदोलन करतील आणि त्यानंतर ते परत सांगतील की मी निर्णय मागे घेत असं पवार म्हणतील, असं भाकीतही त्यांनी केलंय.

पंधरा दिवसात दोन भूकंप! सुप्रिया सुळेंच्या दाव्यानुसार एक आज झाला तर दुसरा कधी आणि कोणता?

शरद पवार यांच्या कोणत्याही निर्णयामागे राजकीय गणितं दडलेली असताता, त्यामुळे त्यांचा हा निर्णयही राजकीय खेळी असल्याची खोचक टीकाही त्यांनी शरद पवारांवर केली आहे. दरम्यान, शरद पवारांच्या या निर्णयनंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबईत उपोषण केलंय. अनेकांनी त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंतीही केली आहे.

त्यावर आता शरद पवार यांनी आपल्याला दोन ते तीन दिवस विचार करण्यासाठी वेळ द्यावा, असा निरोप कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यावर आता शरद पवार कोणता निर्णय घेतील? राजकारणातून संन्यास घेणार का? कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी निर्णय बदलणार का? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यातच असून पवारांच्या पुढील भूमिकेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version