काँग्रेसला शरद पवारांची गरज का? बाळासाहेब थोरातांनी सांगितले कारण
Balasaheb Thorat on Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. पवारांच्या अचानक घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिला आहे. संविधान वाचविण्याकरता शरद पवार यांचे सक्रिय राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र देशात आज लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी मोठा लढा सुरु आहे. अशावेळी शरद पवार यांचं महत्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणातून बाजूला होऊन चालणार नाही, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
पवारांच्या घोषनेनंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यात एकांतात नेमकी चर्चा काय?
बाळासाहेब थोरातांबरोबरच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करणं हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे. पण पवारांसारख्या एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याने राजाीनामा देणं ही खटकणारी बाब आहे. सत्ताधारी भाजपच्या विरोधात राज्यात आणि देशपातळीवर मोट बांधण्यात पवारांचा मोठं योगदान आहे. महाविकास आघाडी स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. भाजपच्या विरोधात विरोधकांना एकत्र करणाऱ्या पवारसाहेबांनी निवृत्तीचा निर्णय घ्यायला नको होता, असं सांगितलं.
मला आता राजकारण सोडायचंय, शरद पवारांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं…
खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया
शरद पवारांच्या या निर्णयामागे कुटुंबातील कलह आहे असे मला वाटत नाही. कारण, शरद पवार यांच्या नावावरच पक्ष आहे. जिथे पवार आहेत तिथे त्यांचा पक्ष, हे ठरलेले आहे. पवार यांनी हा निर्णय का घेतला हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.