Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मानहानीच्या खटल्यात मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील (Pune) न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. सावरकरांच्या नातवाने राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सावरकरांच्या नातवाने पुण्यातील विशेष एमपी आमदार कोर्टमध्ये राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमध्ये सावरकर यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
Pune court grants bail to Congress MP Rahul Gandhi in defamation case. pic.twitter.com/nJEhYeA2VM
— Press Trust of India (@PTI_News) January 10, 2025
विशेष एमपी आमदार कोर्टने राहुल गांधी यांना 25000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच जोपर्यंत न्यायालयात खटला सुरू होत नाही तोपर्यंत ते सावरकरांबद्दल कोणतेही भाष्य करणार नाहीत. असं देखील कोर्टाने म्हटले.
आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी आमची परवानगी घ्या; SC चे BMC ला कठोर निर्देश
या प्रकरणात पुढील सुनावणी 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. राहुल गांधींच्या वकिलाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहण्याची परवानगी मागितली होती, जी न्यायालयाने मान्य केली. या क्रमाने, राहुल गांधी पुणे न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले होते .