Download App

राहुल गांधींना थंडी वाजत नाही, भाजप-कॉंग्रेसमध्ये शाब्दिकयुद्ध

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये पोहचली आहे. भारत जोडो यात्रेमध्ये विविध भागातील लोकांच्या गाठीभेटी घेत असलेले राहुल गांधी चर्चेत तर असतातच पण यामध्ये आणखी एक चर्चा रंगली आहे.

ती म्हणजे केरळपासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या पांढऱ्या टी-शर्टची. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये पोहचली आहे. दरम्यान हिवाळा सुरू आहे. देशाच्या या भागात प्रचंड थंडी असते.

त्यामुळे फक्त पांढरा टी-शर्ट घालणाऱ्या राहुल गांधींना थंडी वाजत नाही का ? याचं कुतूहल सर्वसामान्यांना होत. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी प्रचंड थंडीमध्ये देखील फक्त पांढरा टी-शर्ट घालतात. त्यावरून त्यांच्या फिटनेसच कौतुक केलं.

भाजपकडून मात्र राहुल गांधी फक्त पांढरा टी-शर्ट घालत नाहीत तर ते उष्णतेसाठी पांढऱ्या टी-शर्टच्या आतून थर्मल घालतात. त्यामुळे त्यांना थंडी वाजत नसल्याचे म्हटले आहे. त्यावरून सध्या भाजप-कॉंग्रेसमध्ये वाक् युद्ध रंगलं आहे. भाजपच्या या आरोपानंतर कॉंग्रेसने याला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

दिल्लीतील माजी आमदार आणि भाजपा नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. यात तो फोटो झुम करत राहुल गांधींनी त्यांच्या टी-शर्टच्या आतून थर्मल कपडे घातल्याचा दावा केला. त्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी, ‘भक्त हताश झाले आहेत. ते आता सामूहिकपणे राहुल गांधींची मान, छाती झुम करून पाहत आहेत.’

‘काँग्रेसच्या सोशल मीडिया राष्ट्रीय समन्वयक रुचिरा चतुर्वेदी म्हणाल्या, ‘दोन रुपयांवर काम करणारे ट्रोल्स एका पांढऱ्या टी-शर्टला इतके का घाबरले आहेत ?’ असे प्रतिउत्तर दिले आहे.

Tags

follow us