प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी
Rahul Gandhi Press Conference In Mumbai : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. अरबपती आणि गरिबांमधील ही निवडणूक असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय. अरबपतींना वाटतंय की, मुंबईची जमिन त्यांना मिळाली. यासाठी एक लाख करोडंचं इस्टिमेट आहे. एका अरबपतीला एक लाख करोड देण्याची चर्चा झालीय. आम्हाला असं वाटतंय की, महाराष्ट्रातील गरिब, शेतकरी आणि बेरोजगार तरूणांना मदतीची गरज आहे.
आमचं लक्ष्य महिलांना मदत करण्याचं आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून पिकांना योग्य भाव द्यायचा असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. जातिय जनगणना करणार आहे. हा देशासमोरील प्रमुख मुद्दा आहे. 50 टक्के वर्ग मागासलेला आहे. 15 टक्के दलित आणि 8 टक्के आदिवासींचा समावेश आहेत. आम्हाला आरक्षणाची 50 टक्क्याची मर्यादा तोडायची आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते मान्य नाही. एकीकडे अदाणी असून त्यांचं लक्ष धारावीकडे आहे, महाराष्ट्रातील संपत्तीवर लक्ष आहे. तर दुसरीकडे युवक, शेतकरी, मजूर यांचं स्वप्न रोज सरकार तोडत आहेत. 7 लाख रोजगार राज्याच्या बाहेर गेले असल्याचं देखील मोदी म्हणाले आहेत. त्यांनी या प्रकल्पांची यादी देखील वाचून दाखवली आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार? उद्धव ठाकरेंनी दिलं आश्वासन, म्हणाले हे षडयंत्र…
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. ते म्हणाले की, धारावीतील छोट्या उद्योगधंद्यांना संपवलं जातंय. मोदी आणि अदानी यांचं नातं जुनं आहे. मोदींचा नारा,एक है तो सेफ है, यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टिका केलीय. तिजोरी दाखवत अदानी आणि मोदींवर लक्ष केलंय. एक म्हणजेच मोदी, शहा, अदानी. धारावीतील जमीन हिसकावून अदानीला दिली जातेय, असा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केलाय.
‘खासदार व्हायला गेले अन् आमदार झाले’; भरसभेत पंकजा मुंडेंचं वक्तव्य, म्हणाल्या तुमचीच नजर…
आमचं सरकार आल्यानंतर राज्यातील जनतेच्या इंटरेस्ट सोबत राहणार. धारावीकरांसोबत आम्ही राहणार आहोत. धारावी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले ते बरोबर होतं, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. भाजपला लक्ष विचलीत करायची सवय असल्याची टीका राहुल गांधी यांनी केलीय.