Raj Thackeray News : महाविकास आघाडीत असताना अजितदादांसोबत मांडीला मांडी लावून बसल्यावर मला श्वास घेता येत नव्हता, आता शिंदेंना काहीच करता येत नाही, अशी सडकून टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केलीयं. मनसे उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज डोंबिवलीतून फोडण्यात आला. यावेळी प्रचारसभेत राज ठाकरे बोलत होते.
सुवर्णा कोतकरांची माघार, महाविकास आघाडीत बंडखोरी; जगताप, कळमकर, गाडे यांच्यात लढत
राज ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी जेव्हा 40 आमदार फोडले तेव्हा सांगितलं होतं की, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत असताना अजितदादासोबत मांडीला मांडी लावून बसल्यावर मला श्वास घेता येत नव्हता असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं. शिंदे भाजपसोबत गेले मुख्यमंत्री झाले अचानक कळलं की अजितदादादेखील भाजपच्या मांडीवर जाऊन बसले, आता शिंदेंना काही करता पण येईना, उलट राजकारण सुरु झाल्याची टीका राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलीयं.
तसेच सध्या काय सुरु आहे महाराष्ट्रात हे भवितव्य का? राज्याचा तरुण-तरुणी काम मागताहेत, शेतकरी आत्महत्या करतोयं, कामगार कसाबसा काम करतोयं. राज्यातील नेत्यांची मजाहजा सुरु असल्याची सध्याची परिस्थिती असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंसमोरच पुढचा मुख्यमंत्री ठरला होता :
उद्धव ठाकरे व्यासपीठावर असताना पंतप्रधान मोदी आणि मंत्री अमित शाहांनी पुढचा मुख्यमंत्री फडणवीस असणार हे सांगितलं होतं, त्यावेळी आक्षेप का नाही घेतला? का नाही म्हणालात पुढील अडीच वर्ष आमचा मुख्यमंत्री मग हे काय बोलता, असा थेट हल्लाबोल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केलायं.