उद्धव ठाकरेंसमोर पुढचा मुख्यमंत्री मोदी-शाहांनी सांगितला होता; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा दावा खोडला
Raj Thackeay News : व्यासपीठावर उद्धव ठाकरेंसमोर पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांनी सांगितलं होतं, तेव्हाच का आक्षेप घेतला नाही? असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना (Udhav Thackeray) केलायं. मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ डोंबिवलीत जाहीर सभेतून ते बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवलायं.
सुवर्णा कोतकरांची माघार, महाविकास आघाडीत बंडखोरी; जगताप, कळमकर, गाडे यांच्यात लढत
राज ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे व्यासपीठावर असताना पंतप्रधान मोदी आणि मंत्री अमित शाहांनी पुढचा मुख्यमंत्री फडणवीस असणार हे सांगितलं होतं, त्यावेळी आक्षेप का नाही घेतला? का नाही म्हणालात पुढील अडीच वर्ष आमचा मुख्यमंत्री मग हे काय बोलता, असा थेट हल्लाबोल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केलायं.
2019 च्या निकालानंतर आमच्याशिवाय यांचा मुख्यमंत्री होणार नाही हे समजताच, उद्धव ठाकरेंनी पिळलं अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद द्या नाहीतर आम्ही जातो, वेगळ्या विचारांची युती आघाडी केली. काँग्रेससोबत गेल्यानंतर सर्वच बॅनरवरुन बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाआधीचं हिंदुह्रदयसम्राट हे नाव काढण्यात आलं. बाळासाहेबांचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट करायला कोणी तयार होत नव्हतं, काही ठिकाणी तर उर्दू होर्डिंग मी पाहिली आहेत त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आधी जनाब असं लिहिलेलं मी पाहिलं, स्वत:च्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी तुम्ही इथपर्यंत गेलात अशी सडकून टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीयं.
छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा सांगणारं गाणं! ‘राजं संभाजी’… प्रेक्षकांच्या भेटीला
मागील दिवसांत विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होतं त्यावेळी सगळे आमदार होते. तेव्हाच्या सभापतींना मी सांगितलं की, बाळसाहेबांचं एक चित्र विधानभवनाच्या विधानपरिषदेच्या गॅलरीत लावा, कारण इथे बसलेल्या अनेकांना कळेल की ही पायरी आपण कोणामुळे चढलो कोणामुळे आलो., आता पक्षाशी विचारांशी प्रतारणा केली यांनी विचार नावाची गोष्टच नाही उरली अशी टीकाही राज ठाकरेंनी केलीयं.
उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले ते अडीच वर्षं संपले. ते इकडे पाहत होते आणि खालच्या खाली 40 आमदार गेले. 40 आमदार गेले अन् मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही. मुख्यमंत्र्यांचाच थांगपत्ता नाही अन् खालच्या खाली आमदार निघून गेले, अशीही टीका ठाकरे यांनी केलीयं.