Raj Thackeray Amit Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरेंची तोफ काल माहिमध्ये धडकली. त्यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्याच्यासाठी त्यांनी पहिली प्रचारसभा घेतली. दरम्यान, त्यांनी ठाकरे घराण्याच्या थोडक्यात पटच उलगडला. मार्मिकची सुरुवात ज्या दादर माहीममध्ये झाली. (Amit Thackeray ) शिवसेनेची सुरुवात झाली, सामनाची सुरुवात झाली. त्याच दादर माहीममध्ये आज पहिल्यांदा एक ठाकरे निवडणुकीत उभा राहतोय, अशी भावनिक साद त्यांनी उपस्थितांना घतली.
सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो
लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा मनात पण नव्हते अमित ठाकरे निवडणुकीला उभा राहणार. माझ्या काय त्याच्याही मनात नसेल. पण जे समोर येतील त्यांच्याशी लढू, पण अमित ठाकरेंना नक्की निवडून आणणार, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. नेत्यांची आणि सरचिटणीसची बैठक झाली, तेव्हा अमितच्या उभ राहण्याबद्दल चर्चा झाली. त्यानंतर मी विचारलं तर तुम्ही सांगाल तर राहील असं म्हटल्यावर तो आज उमेदवार आहे. दरम्यान, अमितच्या विरोधात जी माणसे उभी आहेत, त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, मात्र त्या घाणीत मला हात घालायचा नाही असा थेट वार राज ठाकरेंनी यावेळी केला.
Video : राज्यात चमत्कार घडवून दाखवतो फक्त माझ्या प्रचारसभेत राज ठाकरेंनी भरभरून सांगितलं!
त्याचबरोबर माहिममधील लोकांच्या हाकेला 24 तास ओ देणारी माणसे हवीत. अमित राज ठाकरे असे जरी नाव असलं तरी तुम्हाला त्याला भेटण्यासाठी अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही, असंही राज ठाकरे यावेळी जाहीर केलं. तसंच, प्रत्येकासाठी मी सभा घेतोय. हा सगळा इतिहास जेव्हा मी बघतो त्यानंतर 2006 ला मी शिवसेनेतून बाहेर आलो. मी तेव्हा म्हटलं होतं, माझा वाद विठ्ठलाशी नाही, तर आजूबाजूला असणाऱ्या बडव्यांशी आहे. त्यावेळी 37-38 आमदार आले होते. 7-8 खासदार आले होते. ते म्हणत होते की दुसऱ्या पक्षात जाऊया. मी तेव्हा त्यांना म्हणालो की माझा वाद बाळासाहेबांशी नाही अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
वरळीत मनसेची 38 हजार मतं
मला पक्ष फोडायचा नव्हता, माझ्यात ताकद असेल तर मी माझा पक्ष काढेन. तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळी उद्धव ठाकरे आजारी पडले. त्यावेळी मी पहिल्यांदा गाडी घेऊन गेलो होतो. मी कुटुंबाच्या आड कधी राजकारण आणत नाही. गेल्या वेळी आदित्य ठाकरे वरळीतून निवडणुकीसाठी उभा होता , तेव्हा मी मनाने उमेदवार नाही दिला. त्यावेळी मी विचार केला की नाही आमच्या घरातील उमेदवार आहे, मी वरळीला उमेदवार देणार नाही. वरळीत मनसेची 38 हजार मतं आहेत. पण मी हे सर्व माझ्या मनाने केलं, कोणाला फोन केला नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं.