Amit Thackeray Big Statement: ‘वर्षभरानंतर आम्हीच सत्तेत असू’, अमित ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Amit Thackeray Big Statement: ‘वर्षभरानंतर आम्हीच सत्तेत असू’, अमित ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Amit Thackeray Big Statement: ‘एका वर्षानंतर आम्ही सत्तेत येणार असल्याचा मोठा दावा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी केला आहे. अमित ठाकरे यांनी आज सकाळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांची रामटेक निवासस्थानी भेट घेतली आहे.

या भेटीअगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे, त्यांनी यावेळी एक मोठं वक्तव्य केले आहे. शिक्षणमंत्र्यांची भेट घेत त्यांनी शिक्षण हक्क कायद्याच्या (RTE) अंतर्गत 25 टक्के राखीव जागांच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण मुद्दे मांडून या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची यावेळी मागणी केली आहे. अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना असे सांगितले आहे की, ‘एक वर्षानंतर नक्कीच आम्ही सत्तेत येणार आहोत.

आत्ता सत्तेत जायचं की नाही हे राज ठाकरे ठरवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. सध्या राज्याला स्थिर सरकारची खूप गरज आहे. आत्ता माझ्या दृष्टीने राजकिय प्रश्न नाही तर लोकांचे गरजेचे प्रश्न आहेत. अमित ठाकरेंच्या या मोठ्या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसाअगोदर राज ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणामध्ये हे सर्व प्रश्न लवकरच दूर होणार आणि आपण सत्तेत असू असे यावेळी त्यांनी म्हणाले आहेत.

ईडीच्या नोटीसीनंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यामुळे मला चिंता…

अमित ठाकरे यांनी पुढे सांगितले आहे की, ‘शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत शिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आसनांतर आहे. यानुसार २५ टक्के प्रवेश दिले जाणार आहे. तब्बल अठराशे कोटी रुपये सरकारने शाळांना देणे बाकी आहे. यामुळे संस्थांना प्रवेश देणे परवडत नाही. याबाबत शिक्षणमंत्र्यांना अवगत केले आहे.

दरम्यान, ‘पुढील शैक्षणिक वर्षापासून RTE कायदाअंतर्गत पूर्व प्राथमिक वर्गांसाठी २५ टक्के राखीव जागा ठेवण्यात येणार आहे, आणि लवकरात लवकर ज्या खासगी शाळांची प्रतिपूर्ती रक्कम थकीत राहणार आहे. ती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न आपण करणार, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अमित ठाकरे यांना यावेळी दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube