Download App

कर्नाटकच्या निवडणुकीत कॉंग्रेसची बाजी, राज ठाकरे म्हणाले; हा ‘त्यांचा’ पराभव…

Raj Thackeray on karnataka assembly election : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly election) निकाल शनिवारी (13 मे) जाहीर झाले. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा (BJP) पराभव केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निकाल लागल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी भाजपच्या स्वभाव आणि वागणुकीमुळे हा पराभव झाल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. रविवारी (14 मे) अंबरनाथला पोहोचल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कर्नाटक विधानसभेचा निकाल काल समोर आला. कर्नाटक विधानसभेच्या एकूण 224 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेसने 136 जागा जिंकल्या तर भाजपला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागले. जेडीएला 19 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

भ्रष्टाचारी, गुन्हेगारांना गृहमंत्र्यांकडून अभय? राऊतांनी थेट दिले ‘हे’ चॅलेंज!

या निकालावर बोलतांना राज ठाकरे म्हणाले, ‘मी माझ्या भाषणात आधीच सांगितले होते की, विरोधी पक्ष जिंकत नाही, तर सत्ताधारी हरत असतो. मला वाटतं हा पराभव स्वभावाचा पराभव आहे, वर्तनाचा पराभव आहे. आम्हाला वाकवू शकतात, आमचं कोण वाकडं करू शकतो, असा समज असलेल्या वृत्तीचा हा पराभव आहे.’

‘लोकांना, गृहित धरू नये’
लोकांना हलक्यात घेऊ नये, त्यांना गृहित धरू नये, हा या निर्णयातून सर्वांनी धडा घ्यावा, असे राज ठाकरे म्हणाले. कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? असा सवाल केला असता राज ठाकरे म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्रातील निकाल लगेच सांगता येणार नाही.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
कर्नाटकातील विजयाने देशातील निरंकुशता आणि हुकूमशाहीचा पराभव सुरू झाला. सुज्ञ निर्णयाबद्दल कर्नाटकातील जनतेचे अभिनंदन, अशा शब्दांत ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली असून आशेचा किरण दाखवला आहे. काँग्रेसने दणदणीत विजय मिळवलाच आहे, पण, कर्नाटकातील जनतेने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांची जबरदस्ती बेधडकपणे फेकून दिली. भाजपला कर्नाटकातून हाकलून दिले, आता महाराष्ट्रातून हाकलले जाईल, असे ठाकरेंनी सांगितले.

 

Tags

follow us