Download App

Raj Thackeray : कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला; त्या घटनांमध्येही मनुष्यवधाचा…; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेना सुनावलं

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray Said There was laxity even during Corona : रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या कार्यक्रमात उष्मादाहामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकार टीकेचं धनी ठरत आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देखील यावरून सरकारवर निशाणा साधलाा. या घटनेची जबाबदारी घेत मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनाम दिला पाहिजे, अशी मागणी केली. उध्दव ठाकरेंच्या याच वक्तव्याचा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) समाचार घेतला.

राज ठाकरेंनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीती, बीडीडी चाळीसाच पुनर्विकास, सिडकोतील घरांच्या किमती यासह अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी खारघर दुर्घटनेवरही भाष्य केलं.

यावेळी राज ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, खारघर घटनेत सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. त्यावर प्रतिक्रिया देतांना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, कोरोना काळातही सरकारकडून हलगर्जीपणाच्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांमध्येही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो. उगाच यात राजकारण करण्याची गरज नाही, असं सांगितलं

Raj Thackeray : राज्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा, प्रश्न लवकरच मार्गी लागतील

ते म्हणाले, खरंतर सरकारने तो कार्यक्रम दुपारी न करता, सकाळी करायला पाहिजे नव्हता. धर्माधिकारी यांचा सत्कार राजभवनात झाला असता तर बरं झालं असतं. राजभवनात सत्कार झाला असतं, तर गर्दी कमी झाली असती. लोकांना इतर माध्यमातूनही कळलं असतं की, धर्माधिकारी यांनी पुरस्कार मिळालं ते. पण, तो अपघात आहे. त्याचे राजकारण करण्याजी गरज नाही.

यावेळी राज ठाकरेंनी इतर विषयांवरही भाष्य केलं. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावर चर्चा झाली. सिडको गृहनिर्माण लॉटरीमधील 22 लाखाचे घर 35 लाखावर गेले आहे. ते परत 22 लाखाला कसे करता येईल, यावर बोलणं झालं. उद्या एक सिडकोच्या अधिकाऱ्यांची बैठक होईल, आणि मार्ग निघेल. मराठी शाळांचा तो विषय आलेला आहे, तो मुख्यमंत्र्यांना देखील माहित नव्हता. सरकारकडून असा कोणत्याही प्रकारचा आदेश आलेला नाही. त्यामुळं मराठी विषय बंद होणार नाही, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

धर्माधिकारींच्या कार्यक्रमाला लाखो लोक उपस्थित राहतात. कारण, धर्माधिकारींवर जीवपेक्षा प्रेम करणारी लोकं आहेत. पण, ती लोकं आपले मतदार व्हावेत, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता, असा गंभीर आरोप करून मुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आणि त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावर राज ठाकरेंनी सांगितले की, कोरोना काळात हलगर्जीपणाच्या अनेक झाल्या. आजही त्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करता येऊ शकतो, अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली. दरम्यान, या टीकेला उद्धव ठाकरे आता काय उत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us