Download App

Rajendra Shingane : शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी झाली पाहिजे

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर ( Ravikant Tupkar )  यांनी आत्मदहनाचा इशारा होता. त्यांनंतर  पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर व कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज केला होता. यानंतर तुपकर यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते.

यावेळी तुपकरांना भेटण्यासाठी लोकप्रतिनिधींना पोलीस स्टेशनच्या आवारात भेटू दिले नाही.  माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे ( Rajendra Shingane )  यांनाही काही काळ पोलीस स्टेशनच्या गेटवरच उभे राहावे लागले.  डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज झालेल्या या  घटनेचा निषेध केला आहे व झालेल्या घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली आहे.

दरम्यान शनिवारी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनावळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता तुपकर यांनी पोलीस स्थानकातच अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. जोपर्यंत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नसल्याची भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे.

तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथील अरबी समुद्रामध्ये जलसमाधी प्रयत्न केला होता. त्यावेळी सरकारने त्यांना बोलणी करण्यासाठी बोलावले होते. यामध्ये त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्यानंतर उर्वरित मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही त्या पूर्णत्वास गेल्या नव्हत्या.

Tags

follow us