Rajratna Ambedkar News : राज्यात पुढील काही दिवसांत विधानसभा निवडणूका (Maharashtra Assembly Election) होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच आता राज्यातील जनतेसमोर तिसरा पर्याय मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची तिसरी आघाडी उभी ठाकलीयं. एकीकडे निवडणुकीवरुन दावे, प्रतिदावे, पक्षांतर्गत वाद सुरु असतानाच तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून मनोज जरांगे यांच्या नावाची घोषणा राजरत्न आंबेडकरांनी (Rajratna Ambedkar) केलीयं. हिंगोली दौऱ्यादरम्यान, आंबेडकर बोलत होते. आंबेडकरांच्या या घोषणेमुळे आता आगामी काळात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीचे सर्वच घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अशातच आता तिसरी आघाडीदेखील पर्याय म्हणून उभी राहणार असल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या गुप्त बैठका सुरु झाल्या असल्याचा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात येत आहे. वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे बैठकीत चर्चा सुरु असल्याचा दावा केलायं. त्यामुळे पुढील काळात कोणता राजकीय भूकंप होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काय सांगता! ‘लॉकडाऊन’ने चांदोमामाही गारठला होता.. भारतीय वैज्ञानिकांच्या अभ्यासात मोठा खुलासा
महाविकास आघाडी आणि महायुतीला चीतपट करण्यासाठी राज्यात नव्या नांदीला चांगलाच वेग आल्याची परिस्थिती आहे. राज्यात आता विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी उदयास येत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेतला असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय बौद्ध महासभेचे राजरत्न आंबेडकर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संभाजीराजेंनी तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरु असल्याचे माध्यमांना स्पष्टपणे सांगितलं होतं.
सर्वांसाठीच आमची दारं उघडी…
तिसऱ्या आघाडीसाठी बैठक पार पडल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांद्वारे राज्यातील सर्वच छोट्या-मोठ्या पक्षांना खुलं आवाहन केलं होतं. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचं जे राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्राला आवडणारं नाही. बच्चू कडू हे परखड व्यक्तिमत्व आहे. आम्ही एकत्र येण्यासाठीच्या चर्चा सुरु आहेत, मनोज जरांगेदेखील सकारात्मक आहेत. आम्ही सर्व जण मिळून महाराष्ट्राला एक चांगला पर्याय देणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं होतं.