Raju Shetti On BJP : भाजपचं राजकारण आम्हाला मान्य नसून भाजपसोबत आमचं कधीच जमणार नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठामपणे सांगितलं आहे. लेट्सअप मराठीशी बोलताना राजू शेट्टी यांना थेट विचारण्यात आलं होतं. त्यावर शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
…पण उद्या मी लोकसभा लढवणारच, राजू शेट्टींनी पवारांना ठणकावून सांगितलं होतं…
राजू शेट्टी म्हणाले, मी काही कोंडीत पडलेलो नाही. राज्यातील चोर लफंग्यांनी आणखी 20 वर्षे जपून रहावं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील काही सुक्त गुण जे आधी बाहेर आले नव्हते ते नंतर बाहेर आले आहेत, या शब्दांत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
RCB vs SRH: रनमशीन विराट कोहलीचे हैद्राबादविरुद्ध असे आहे रेकॉर्ड…
तसेच राज्यात सध्या सुरु असलेली भाजपची संस्कृती मला पटत नसून मतभेत हवेत पण ते वैचारिक असले पाहिजेत, असं स्पष्ट मत यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपडून ज्या गोष्टी घडवून आणल्या जात आहेत त्या मला पटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
क्रिकेटच्या दादाची सुरक्षा का वाढवली? जाणून घ्या नेमकं कारण
राज्यातील नेत्यांना संपवून टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस सध्या करीत आहेत. हे असं राजकारण मी याआधी कधीही पाहिलेलं नाही. त्यांना मी त्रयस्त म्हमून सल्ला देऊ शकतो पण तरीही मला त्याचं राजकारण मान्य नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
राज्यातील नेत्यांना भाजपचे लोकं ईडीचा गैरवापर करुन त्रास देत आहेत. भाजपचे नेते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. ज्या नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जाते, त्यांनी जर भाजपात प्रवेश केला तर ईडीची कारवाई बंद होते. हे सर्व काही भाजपचं घडवून आणत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.