…पण उद्या मी लोकसभा लढवणारच, राजू शेट्टींनी पवारांना ठणकावून सांगितलं होतं…

…पण उद्या मी लोकसभा लढवणारच, राजू शेट्टींनी पवारांना ठणकावून सांगितलं होतं…

आज मला तुम्ही विधान परिषेदचा आमदार करतायं पण उद्या मी हातकणंगलेमधून लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्य्क्ष शरद पवार यांना ठणकावून सांगितलं होतं. लेट्अप मराठीशी बोलताना राजू शेट्टी यांनी शरद पवारांसोबत झालेल्या समझोत्याबद्दल स्पष्ट केलं आहे.

पवारांची बंदूक ठाकरेंवर निशाणा; बालगंधर्वमध्ये ‘लोक माझे सांगाती’ वरून फडणविसांची तुफान फायरिंग

राजू शेट्टी म्हणाले, सतिष काकडे आणि मी शरद पवारांच्या घरी देशी गायीवरील संशोधन प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर आम्ही घरी जेवणासाठी गेलो. त्यावेळी शरद पवारांनी महाविकास आघाडीतून स्वाभिमानीला एक जागा देण्याचं ठरवलं होतं. त्यावर राज्यपालांनी जर आक्षेप घेतला तर अडचण निर्माण होणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितल्याचं शेट्टी यांनी सांगितलं आहे.

सत्यजीत तांबेंच्या आमदारकीला 100 दिवस पूर्ण; असे बनवले काँग्रेस, भाजपाला ‘मामा’

त्यावेळी मला विधान परिषेदच्या आमदारकीची ऑफर देण्यात आली होती. मी देखील ऑफर स्विकारली होती. त्यानंतर ते काही झालंच नाही. मी देखील विधानपरिषेदसाठी माझ्या नावाचा विचार करु नका, असं शरद पवारांना सांगितलं होतं. त्याचवेळी मी पवारांची भेट घेऊन म्हणालो, मी वेगळा माणूस आहे.

सलमान खानच्या बहिणीच्या घरी मारला डल्ला; जवळचा व्यक्तीच निघाला चोर

तुमची महाविकास आघाडी 2024 पर्यंत टिकेल की नाही मला माहित नाही. हातकणंगलेची लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडे आहे. आज तुम्ही मला आमदारकी दिली तरी मी उद्या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं ठणकावून सांगितलं असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं होतं.

त्यावर शरद पवारांनी मला राजकारणामध्ये असं बोलायचं नसतं, अशी प्रतिक्रिया माझ्या वक्तव्यावर शरद पवारांनी दिल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. दरम्यान, त्यावेळी शरद पवारांच्या घरी जेवणाचा बेत आखल्यानंतरच राजू शेट्टी यांना आमदारकी देण्याचं ठरलं असल्याची चर्चा राजकारणात होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube