क्रिकेटच्या दादाची सुरक्षा का वाढवली? जाणून घ्या नेमकं कारण

क्रिकेटच्या दादाची सुरक्षा का वाढवली? जाणून घ्या नेमकं कारण

Sourav Ganguly Z+ Security : पश्चिम बंगाल सरकारने (West Bengal Govt)बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. ममता बॅनर्जींचे (Mamata Banerjee)सरकार आता सौरव गांगुलीला झेड श्रेणीची सुरक्षा देणार आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार क्रिकेटच्या दादावर आठ ते दहा पोलिसांची नजर असणार आहे. यापूर्वी दादाला वाय दर्जाची सुरक्षा होती, त्यामध्ये तीन पोलिसांचे संरक्षण होते.

सलमान खानच्या बहिणीच्या घरी मारला डल्ला; घरातील व्यक्तीच निघाला चोर

बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांना यापूर्वी वाय दर्जाची सुरक्षा होती. त्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी सरकारने दादाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, व्हीव्हीआयपी सुरक्षा संपल्यानंतर प्रोटोकॉलनुसार आढावा घेण्यात आला.


त्यानंतर गांगुलीची सुरक्षा झेड श्रेणीमध्ये वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दादाच्या सुरक्षेला काही धोका आहे का नाही हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

मंगळवारी राज्य सचिवालयाचे प्रतिनिधी दादाच्या बेहाला कार्यालयात पोहोचले, तिथे त्यांनी कोलकाता पोलीस मुख्यालय लालबाजार आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

दादा सध्या त्याच्या दिल्ली टीमसह प्रवास करत आहे. 21 मे रोजी कोलकाता येथे परत येईल. त्या दिवसापासून त्याला झेड दर्जाची सुरक्षा दिली जाणार असल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube