Raju Shetty Ultimatum To government On FRP : ऊस उत्पादक (Sugarcane) शेतकऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये योग्य आणि किफायतशीर किंमत (FRP) देण्याची तरतूद करणारा 21 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेला महाराष्ट्र सरकारचा ठराव (GR) मुंबई उच्च न्यायालयाने काल रद्द केला. तो ‘बेकायदेशीर आणि निरर्थक’ ठरवला. यावरून आता शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) हे आक्रमक झाल्याचं समोर आलंय. त्यांनी सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
राजू शेट्टी म्हणाले, उच्च न्यायालयाचा एक रक्कम एफआरपी देण्याचा निर्णय झाला होता. कारखान्यांनी विलंब केला, त्या कारखान्याने व्याजाचे पैसे द्यावे हे विचारण्यासाठी आज साखर आयुक्तांकडे आलो होतो. जवळपास 7 हजार कोटी एफआरपी थकित असल्याचं समोर आलंय. आम्ही आठ दिवस वाट बघू नाही, तर आठ दिवसानंतर आम्ही इथे येऊ आणि सगळी रक्कम वसूल करू, असा अल्टिमेटम राजू शेट्टी (Farmer Leader) यांनी दिलाय.
मोठी बातमी! छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी
नवीन नियम करण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे, हायकोर्टाला अधिकार नाही. 2019 पासून अनेक साखर कारखान्यांनी आरएसएम हिशोब दिले नाहीत, मग हे साखर आयुक्त काय करतात? इथे बसणारे सगळे हजामत करतात का? असा देखील सवाल त्यांनी केलाय. अनेक बैठका होत नाहीत, समिती स्थापन करण्यासाठी आंदोलन करावे लागले. सरकार कारखानदारचे बटिक झाले आहेत, असं वाटतंय अशी टीका देखील राजू शेट्टी यांनी केलीय.
साखर कारखानदारी अडचणीत येऊ नये, प्रत्येक कारखान्याला त्याच्या कार्यक्षेत्राच्या 25 किलोमीटर दुसऱ्या कारखान्याचा लायसन मिळणार नाही, अशा प्रकारचं संरक्षण देण्यात आलं. तशी परवानगी दिली तर कारखाने आजारी होतील, पण ही परवानगी कोणी दिली? एवढा विचार करताना अक्कल कुठे ठेवली होती, असं देखील त्यांनी विचारलं आहे.
एक रकमी एफआरपी देण्यास नकार देण्यास शक्य आहे, आरसीएम ठरवणारे आणि कोर्टात जाणारे सगळे हेच. यावर्षीच सहकार संपायची भीती वाटतेय, असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलंय. कोरटकरवर बोलताना राजू शेट्टी यांनी म्हटलंय की, मुख्यमंत्री म्हणतात कोरटकर चिल्लर माणूस आहे, तर हा चिल्लर माणूस एक महिना का सापडत नव्हता? कोरटकर, सोलापूरकर अशी माणसे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी पेरली गेली आहे.
शेतकऱ्यांना एफआरपी मिळत नाही, सोयाबीन खरेदी केले जात नाही. एक ना अनेक प्रश्न आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. दंगली घडत आहेत. असे प्रश्न असताना लोकांना लोकांची माथी भडकवायची, आपलं अपयश लपवायचं हेच याच्या पाठीमागचा कारण आहे. सरकार औरंगजेब पेक्षाही वाईट वागत आहे. आमच्या या प्रश्नाचे उत्तर मला हवेय, असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलंय.