Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 34 टक्के वाढ, पवार-मुंडेंच्या मध्यस्थीने निघाला तोडगा
Sugarcane Workers : ऊसतोड मजुरांच्या (Sugarcane workers) मजुरीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी ऊसतोड मजुरांनी केली होती. ऊसतोड मजुरांच्या मुजरीत वाढ न झाल्यास महाराष्ट्रतील एकही साखर कारखाना चालू देणार नाही आणि 5 जानेवारीनंतर रस्त्यावर उतरू, असा इशारा ऊसतोड कामगारांनी दिला होता. दरम्यान, आज राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये 92 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मध्यस्थीने ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघाला.
‘तत्त्व अन् सत्त्व न बदल्याने निधी मिळण्यास अडचणी’; कोल्हेंची सत्ताधाऱ्यांवर सडेतोड टीका
अपेक्षित दरवाढ न झाल्यास कोयताबंद आंदोलनाचा इशाारा ऊसतोड कामगार संघटनांनी दिला होता. त्यामुळं ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर विचार विनिमय करण्याासठी पुण्यातील साखर संकुलात साखर कामगार आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीला राज्य साखर महासंघाचे पी.आर.पाटील, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर महासंघाचे संचालक जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.
कॉंग्रेस नेते पवन खेरा यांना SC चा झटका! एफआयआर रद्द करण्यास नकार
सध्या ऊसतोड कामगारांना सध्या प्रतिटन 274 रुपये मजुरी दिली जाते. त्यात 34 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना चालू हंगामापासून 366 रुपये प्रतिटन या दराने मजुरी मिळणार आहे. दरम्यान, मुकादम यांच्या कमिशनमध्येही एक टक्क्याने वाढ करण्यात आली असून त्यांना मुजरीच्या २० टक्के कमिशन देण्यात येणार आहे.
यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, या बैठकीत कोणतेही मतभेद मतभेद न होता, समाधानकारण निर्णय झाला. ऊसतोड मजुरांच्या मजुरीत 34 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं सागितलं. यावेळी त्यांनी राज्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे काम अपेक्षित गतीने सुरू नाही. याबाबत आपण असमाधानी मुंडे यांनी सांगितलं. यासंदर्भात आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपस्थित राहिल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.