‘तत्त्व अन् सत्त्व न बदल्याने निधी मिळण्यास अडचणी’; कोल्हेंची सत्ताधाऱ्यांवर सडेतोड टीका
Amol Kolhe News : ज्यांनी तत्व आणि सत्व बदलली नाहीत, त्यांना निधी मिळत नसल्याची सडेतोड टीका राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवर केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हेंकडून अजित पवार गटावर जोरदार टीका केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या शिबिरानिमित्त खासदार कोल्हे अहमदनगर दौऱ्यावर होते. नगर तालुक्यातील मांजरसुबा येथे गोरक्षनाथ गडावरती खासदार अमोल कोल्हे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
हातकणंगले : शेट्टींच्या साथीने ‘मविआ’ एकवटली, शिंदे-भाजपचे अजूनही एकमेकांच्या पायात-पाय
अमोल कोल्हे म्हणाले, विरोधी पक्षातील नेत्यांना आमदारांना निधी न देणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा पद्धतीचे राजकीय भेदाभेद होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. व ज्यांनी तत्व आणि सत्व बदलली नाहीत त्यांना निधी मिळत नाही असं दिसून येतं मात्र आमदार प्राजक्त तनपुरे यांनी निधी मंजूर करून विकास काम केली असे यावेळी कोल्हे म्हणाले आहेत.
राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना निधी कमी मिळणं किंवा निधीला अडचणी येणे अशा समोर आल्या होत्या यावर अमोल कोल्हे यांनी भाषा करताना सरकारवर निशाणा साधला आहे. जे कोणी विरोधातले आमदार खासदार असतील त्यांना निधी द्यायचा नाही. मात्र, निधी हा कोणी काही कोणाच्या खिशातून देत नाही तो जनतेच्या टॅक्स स्वरूपातून दिला जात असतो. या पैशाचा जो विनीयोग असतो हा जनतेसाठी खर्च करणे यालाच आपण निधीचा विनियोग असं म्हणतो, असंही कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे.
चलो ऊस साईड ईडीका नोटीस आया…
तसेच आजकाल महाराष्ट्राचे राजकारण पाहिलं तर तर कधी कधी असं वाटतं की “चलो ऊस साईड ईडीका नोटीस आया…चलो ऊस साईड ईडीका नोटीस आया” असं वातावरण सध्या निर्माण झालेला असताना देखील तनपुरे यांनी तत्व आणि सत्व यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले, असल्याचंही अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे. देशातील महिला कुस्तीपटूंना न्याय मिळत नाही. त्यांना त्यांना नाईलाजाने मिळाला या खेळाला अलविदा करावा लागतो. त्या महिला कुस्तीपटू ज्यांच्यावर आरोप करतात, त्यांना जर अभय दिले जात असेल तर त्यांना प्रभू श्रीराम कसे पावतील? असा खोचक सवालही त्यांनी केलायं. प्रभू श्रीराम यांनी वनवास स्वीकारला, तो पित्याचं वचन पूर्ण करण्यसााटी. आपल्या गुरूंना दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना श्रीराम कसे पावणार, असंही कोल्हे म्हणाले आहेत.