महाविकास आघाडीत येण्याचा आंबेडकरांचा मार्ग मोकळा! शरद पवारांनी दिला ग्रीन सिग्नल

महाविकास आघाडीत येण्याचा आंबेडकरांचा मार्ग मोकळा! शरद पवारांनी दिला ग्रीन सिग्नल

Sharad Pawar On Prakash Ambedkar : इंडिया आघाडीत (India Alliance) वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याबाबत शरद पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीचा समावेश करुन घ्यावा, असं इंडिया आघाडीला सुचवणार असल्याचं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिर्डीतील आयोजित राज्यस्तरीय शिबिरात शरद पवार बोलत होते.

‘आमदार अन् प्रकल्प पळवून स्वत:चाच विकास’, भाजपच्या विकासावर सुप्रिया सुळेंची जळजळीत टीका

शरद पवार म्हणाले, देशात सत्तेचा गैरवापर सुरु आहे. त्यासाठी मोदी सरकार बदलून पर्याय उभं करणं गरजेचं आहे. त्यासाठीच आम्ही देशातील भाजपविरोधी पक्षांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस, डावे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे, आम आदमी पार्टीचा समावेश आहे. अलीकडेच प्रकाश आंबेडकरांसोबत युतीबाबत बैठक झाली असून ही बैठक योग्य मार्गावर आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनाही इंडिया आघाडीत सामावून घेण्यासाठी आघाडीतल्या नेत्यांना सांगणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

YS Sharmila : CM जगनमोहन यांना धक्का! बहिण शर्मिलांची काँग्रेसमध्ये एन्ट्री; पक्षही केला विलीन

बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी काय सांगितलं?
शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या बैठकीबाबत खुद्द शरद पवारांनी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवण्याच्या कामासाठी प्रकाश आंबेडकरांचं पूर्णपणे सहकार्य आहे. मोदींना सत्तेतून हटवण हीच भूमिका प्रकाश आंबेडकरांनी बैठकीत मांडली असल्याचं शरद पवार यांनी भाषणादरम्यान सांगितलं आहे.

देशात आणि राज्यात भाजपविरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली असून पुढील काळात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यात येणार आहे. या बैठकीला आघाडीतील सर्वच पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.

PM मोदींच्या सेल्फी बूथसाठीच्या खर्चाची माहिती दिल्यानं रेल्वे अधिकाऱ्याची बदली, कॉंग्रेसचा आरोप

काही दिवसांपासून महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत नसून ठाकरे गटासोबत युती असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर इंडिया आघाडीसाठी आपण युतीसाठी तयार असल्याचं आंबेडकरांनी जाहीर केल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाहीतर आंबेडकरांनी मल्लिकार्जून खर्गें यांना पत्रही लिहिलं होतं. मात्र, पत्रावर इंडिया आघाडीकडून कोणतंही प्रत्युत्तर आलं नव्हतं.

अखेर प्रकाश आंबेडकरांनीच पुढाकार घेत महाविकास आघाडीसमोर आगामी लोकसभेसाठी 12-12 जागांचा फॉर्मूला समोर ठेवला. यासंदर्भात आंबेडकरांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. या पत्रावरही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंबेडकरांसोबत युती करणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर आज खुद्द शरद पवारांनीच अधिकृतपणे वंचितला सोबत घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube