Download App

‘त्यांच्या तोंडून खऱ्या कुस्ती स्पर्धेची भाषा शोभत नाही’, शिंदेंचा रोहित पवारांना टोला

  • Written By: Last Updated:

Ram Shinde Criticize Rohit Pawar On Maharashtra Kesari : महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ( Maharashtra Kesari Kusti Spardha) अहिल्यानगर जिल्ह्यातील वाडिया पार्क येथे काही दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कर्जत जामखेड येथे पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतली जाणार आहे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) जाहीर केलं आहे. मात्र, आता या कुस्ती स्पर्धेवरून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी (Ram Shinde) रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरण आता ज्येष्ठ वकील उज्वल निकम लढणार, राज्य सरकारचा निर्णय

जसं साहित्य संमेलन झाल्यानंतर विद्रोही साहित्य संमेलन घेतलं (Ahilyanagar News) जातं, तशा पद्धतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्यानंतर आता विद्रोही कुस्ती स्पर्धा घेणाऱ्यांनी निवडणुकीत नुरा कुस्ती केली. आता त्यांच्या तोंडून खऱ्या कुस्ती स्पर्धेची भाषा शोभत नाही, असा टोला राम शिंदे यांनी रोहित पवार यांना लगावला आहे.

राम शिंदे नेमकं काय म्हणाले?

वाडिया पार्कमध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा चांगल्या नियोजन करून पार पडल्या आहेत. या स्पर्धा झाल्यानंतर विद्रोही साहित्य संमेलन घेतात, तशी विद्रोही महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वत: निवडणुकीत नुरा कुस्ती केली. ते आता खऱ्या कुस्तीची भाषा करत आहे, हे त्यांना शोभत नाही अशी टीका विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केलीय.

अरे बापरे! दर मिनिटाला एका महिलेचा कॅन्सरने मृत्यू, WHO चा धक्कादायक अहवाल

गेल्या काही वर्षात कुस्ती क्षेत्र वादाच्या भोवऱ्यात दिसतंय. दोन संघटना झाल्यामुळे दोन वर्षापासून दोन्ही संघटनांकडून वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यात येत आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांच्यामध्ये वाद सुरू आहे. यासंदर्भात न्यायालयीन लढाई सु्द्धा सुरू आहे. दरम्यान आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून येत्या 26 ते 30 मार्च रोजी कर्जत जामखेड इथं 66 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

follow us