मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरण आता ज्येष्ठ वकील उज्वल निकम लढणार, राज्य सरकारचा निर्णय

Ujjwal Nikam as special public prosecutor in Santosh Deshmukh murder : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात सरकारने मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची (Ujjwal Nikam) विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर पोस्ट करत दिली आहे. सोबतच त्यांनी पत्रक देखील जोडलेलं आहे.
अरे बापरे! दर मिनिटाला एका महिलेचा कॅन्सरने मृत्यू, WHO चा धक्कादायक अहवाल
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यभरातील वातावरण अजूनही (Santosh Deshmukh murder) तापलेलं आहे. दोन महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली होती. दोन महिने उलटले तरी सर्व आरोपींना अटक झाली नाही, त्यामुळे देशमुख कुटुंबीय आक्रमक झालेत. संपूर्ण गावासह देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. pic.twitter.com/CkHIgGNneF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2025
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय (Beed Crime) घेतलाय. मस्साजोगच्या देशमुख कुटुंबाची मोठी मागणी आता मान्य झालीय. या हत्या प्रकरणात ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी देशमुख कुटुंबाने केली होती. ती आता पूर्ण झालीये. निकम यांची याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आलीय.
बिटकॉईन महाराष्ट्रात तब्बल 6600 कोटींचा घोटाळा; महिन्याला 10 टक्के व्याजाचा रचला सापळा अन्…
संतोष देशमुख हत्या प्रकरण आता उज्वल निकम लढणार आहे. त्यामुळे मोठा दिलासा देशमुख कुटुंबियांना मिळाला आहे. संतोष देशमुख हे मस्साजोग गावचे सरपंच होते. हत्येत सहभागी असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी आणि न्याय मिळवून द्यावा, ही मस्साजोगच्या आंदोलकांची मुख्य मागणी आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली.
घटनेला 70 दिवस उलटून गेले तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यात आलेली नाही. कृष्णा आंधळेला पकडलं न गेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. आरोपींना अटक करण्यासाठी त्यांनी पोलिसांना 11 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला होता. संतोष देशमुख हत्याकांडाच्या विरोधात ग्रामस्थांनी ‘जल समाधी’ आंदोलनही केलंय.