साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवाव्या, साहित्यिकांनीही पार्टी लाईन्सवर कमेंट करू नये; CM फडणवीस

Devendra Fadnavis : दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात (Akhil Bhartiy Marathi SAhitya sammelan) शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी (Neelam Gorhe) ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात बोलत असताना उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केलेत. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळतं, असा आरोप गोऱ्हे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण पेटलं आहे. दरम्यान, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेतकऱ्यांना वर्षाला 15 हजार मिळणार मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत, तसेच साहित्यिकांनी पार्टी लाईनवर कमेंट कऱणं योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारलं असता फडणवीस म्हणाले की, नीलम गोऱ्हे ठाकरेंच्या पक्षात होत्या, मी काही त्यांच्या पक्षात नव्हतो. त्यामुळं त्यांच्या पक्षात काय चालायचं ते नीलमताईच सांगू शकतील. मला त्याबद्दल माहिती नाही. मात्र, साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ते म्हणाले की, मला असं वाटतं प्रत्येकानेच संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत. विशेषत जे साहित्यिक आहेत, त्यांना असं वाटतं की, राजकारणी लोकांनी आमच्या व्यासपीठावर येऊ नये. मग साहित्यिकांनी देखील पार्टी लाईन्सवर कमेंट करू नये. त्यांनीही मर्यादा पाळाव्यात, असं फडणवीस म्हणाले.
धर्मावरून बंदी नाही…
पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आला आहे. यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. कानिफनाथ यात्रेमध्ये व्यावसायिकांवर जातीवरून किंवा धर्मावरून बंदी आणली नाही. जे नियम पाळत नाहीत, त्यांच्यावर बंदी आणली आहे, असं फडणवीस म्हणाले.
मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर होत असलेल्या आरोपांविषयी बोलताना फडणवीसम म्हणाले की, आमच्याकडे कोणीही तक्रार केली तर त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो. सध्या चौकशी सुरू आहे. तक्रार झाली म्हणजे, अनियमितता झाली असं म्हणण्याचं कारण नाही, चौकशीत दोषी आढळले तर कारवाई करू, असं फडणवीस म्हणाले.