Download App

महायुतीसमोर मोठा पेच! रामदास आठवलेंच्या 12 जागांचं गणित कसं सुटणार?

विधानसभेत भाजपच्या कोट्यातून आम्हाला 10 ते 12 जागा मिळाव्यात आणि सरकार आलं तर आम्हाला झाल्यास 1 ते 2 मंत्रीपदे मिळावी.

  • Written By: Last Updated:

Ramdas Athawale : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. सध्या महायुतीचे जागावाटप तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटप सुरू आहे. या जागावाटपात मित्रपक्षांचा समावेश करण्यात आलेला नाही. अशातच आता आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महायुतीकडे (Mahayuti) 10 ते 12 जागांची मागणी केली.

मेहकरच्या मैदानात रायमुलकरांना कडवं आव्हान; ठाकरे-तुपकर डाव पलटवणार? 

रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीकडे 10 ते 12 जागा मागणार आहोत. विधानसभेत भाजपच्या कोट्यातून आम्हाला 10 ते 12 जागा मिळाव्यात आणि सरकार आलं तर आम्हाला झाल्यास 1 ते 2 मंत्रीपदे आणि महामंडळं मिळावी, अशी अपेक्षा आहे, असं आठवले म्हणाले.

Anil Kapoor: एमी 2024 अनिल कपूरच्या ‘द नाईट मॅनेजर’ला ड्रामा सीरीज श्रेणीत खास नामांकन 

पुढं ते म्हणाले, विधानसभेत आरपीआयचा विचार व्हावा, आम्हाला डावलू नये, याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आम्हाला भाजपच्या कोट्यातील समजू नये. तिघांनी मिळून जागा द्यावात. 23 सप्टेंबर रोजी आमचे शिष्टमंडळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे. त्यावेळी आम्ही 18 जागा मागणार आहोत. त्यापैकी किमान 10 ते 12 जागा मिळाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे.

या मतदारसंघांवर दावा

उमरखेड, धारावी, मालाड, चेंबूर आणि वाशीम विधानसभा मतदारसंघ महायुतीने आम्हाला सोडावा, अशी मागणी आठवले यांनी केली. या मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाची निर्णायक ताकद आहे. हे मतदारसंघ आम्हाला सोडले तर आमचे आमदार विधानसभेत पोहोचतील असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांना महायुतीत येण्याचं आव्हान केलं. ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने थोडा सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. वंचितने महायुतीत (एनडीए) यावं, त्यांना माझं निमंत्रण आहे. ते महायुतीत आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल. ते आले तर मला मंत्री नाही केलं तरी चालेल, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा, अशी मागणी मी स्वत: करेन, असं आठवले म्हणाले.

वन नेशन, वन इलेक्शनला पाठिंबा…
नुकतीच केंद्र सरकार वन नेशन, वन इलेक्शनच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. मात्र, विरोधकांनी त्याला विरोध केला आहे. यावर आठवले म्हणाले, पूर्वी वन नेशन वन इलेक्शन अशी व्यवस्था होती. संविधानात अशी तरतूद होती. सुरुवातीला काही निवडणुका अशाच झाल्या आहेत. त्यामुळं देशाचा फाय़दा होणार आहे. हा काही हुकूमशाही आणण्याचा विषय नाही. या विधेयकाला माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे.

follow us