Download App

विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांवरच ठाम विश्वास; दिल्लीत झाला मोठा निर्णय

महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष व इतर बदल होणार नाही. महायुतीचे सरकार मजबूतपणे पुन्हा आणायचे असल्याचे गोयल यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis and core bjp meeting in delhi लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीवर महाविकास आघाडी भारी पडली. महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या. त्यात भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या होत्या. तर एक अपक्ष धरून महाविकास आघाडीला तब्बल 31 जागा मिळाल्या आहेत. महायुतीला बसलेल्या सेटबॅकची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेत थेट पदमुक्त करण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केली होती. परंतु केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांची विनंती फेटाळून लावली आहे. तर आज दिल्लीत भाजपच्या (BJP) कोअर टीमची बैठक केंद्रीय नेतृत्वासमोर झाली. त्यात महाराष्ट्रात कोणताच बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे राहणार आहेत. तर विधानसभेची निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होणार हेही स्पष्ट झाले आहे.


रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

दिल्लीतील कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय नेतृत्वासमोर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विस्तारीत चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये केवळ 0.3 टक्के मतांचे अंतर आहे. कुठे मतदान झाले. कुठे मतदान कमी झाले. काय अडचणी होत्या. काय अॅक्शन घ्यायची आहे. विधानसभेती रणनीती काय असली पाहिजे, या ब्लू प्रिंटवर चर्चा झाली आहे. महाराष्ट्रात निवडणूक जिंकण्यासाठी रणनिती आखणार असून, केंद्रीय नेतृत्व आमच्या पाठीशी आहे. निवडणुकीसाठी रोडमॅप तयार करत आहे. महायुतीमधील पक्षांशी चर्चा करून रणनिती आखली जाईल. केंद्रीय भाजपची पूर्ण ताकद निवडणुकीत आमच्या पाठीशी असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.


Box Office: कोकणातल्या मुंज्याने बॉक्स ऑफिस झपाटलं, अकराव्या दिवशी केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई

महाराष्ट्रात भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष व इतर नेत्यांबाबत काही बदल होणार का? यावर फडणवीस हे उत्तर देत असताना केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी त्यांना रोखले. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष व इतर बदलाबाबत कुठलाच निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार मजबूतपणे पुन्हा आणायचे असल्याचे गोयल यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

follow us