खानदेशात शिंदे गटाचा सुपडा साफ ! भाजप अन् महाविकास आघाडीला मतदारांचा हात..
खानदेशातील धुळे, जळगाव आणि नंदूबार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल लागले आहेत. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव , परोळा , चोपडा , रावेर, जामनेर आणि भुसावळ या सहा बाजार समित्यांचे निकाल लागले आहेत. यात परोळा या आतिशय चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सतीश पाटिल यांनी शिवसेना (शिंदे गट) चे आमदार चिमण आबा पाटील यांचा धुव्वा उडवला. एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यानंतर भुसावळ बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जोरदार झटका बसला. एकनाथ खडसे यांचे शिष्य समजले जाणारे भाजप आमदार संजय सावकारे यांनी आपल्या गुरु एकनाथ खडसे यांचा पराभव केला.
जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच मंत्री गिरीश महाजन यांनी सर्वाच्या सर्व 18 जागा जिंकत विरोधकांचा सुपडा साफ केला. चाळीसगाव कृषी उत्त्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. ही बाजार समिती भाजपने 18 पैकी 15 जागा जिंकल्या. आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार उन्मेष पाटिल यांच्या नेतृत्वात भाजपने हा विजय खेचून आणला.
Mann ki Baat : आज 100 वा भाग; दिल्लीपासून थेट UN पर्यंत आवाज पोहोचणार
रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस आमदार शिरीष चौधरी यांनी सत्ता राखली आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदार असलेल्या लतिका सोनवणे यांचा मतदारसंघ असलेल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत त्रिशंकू स्थिती आहे. या ठिकाणी शिंदे गटाविरोधात सर्व एकत्र येण्याची शक्यता आहे.
धुळे जिल्ह्यात शिंदखेडा बाजार समितीमध्ये भाजप आमदार माजी मंत्री जयकुमार रावल यांनी सर्व 18 जागा जिंकत सर्वच विरोधकना धोबीपछाड दिला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत धक्कादायक निकाल लागला आहे. याठिकाणी माजी आमदार पी. के. अण्णा पाटील पॅनलची 41 वर्षाची सत्ता उलटली आहे . याठिकाणी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अभिजीत पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली.
महेंद्र थोरवेंना पुढच्या निवडणुकीत गुलाल लागू देणार नाही, सुषमा अंधारेंचं खुलं आव्हान
नंदूरबार कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये चंद्रकांत रघुवंशी तर नवापूरमध्ये काँग्रेस आमदार शिरीष नाईक यांनी सत्ता राखली आहे. दरम्यान, आज रविवारी दुसऱ्या टप्प्यात होणाया निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या बोदवड, गुलाबराव पाटील यांच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.