पंढरपूर-कराड रोडवर भरधाव ट्रकचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 5 महिलांवर काळाचा घाला

पंढरपूर-कराड रोडवर भरधाव ट्रकचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 5 महिलांवर काळाचा घाला

Pandharpur Karad Accident 5 dead 3 Serious injured : पंढरपूरमध्ये पंढरपूर-कराड रोडवर असलेल्या कटफळ या ठिकाणी भीषण अपघात ( Pandharpur Karad Accident ) झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना जोरदार धडक दिली त्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये या पाचही महिलांचा जागीच मृत्यू झालाय तसेच तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

आमदार संग्राम जगताप मंत्री होणार का? तटकरेंनी थेट नगरमधूनच सांगितलं फ्यूचर पॉलिटिक्स

दरम्यान या जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला हलवण्यात आलं आहे. तसेच या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस फौज फाट्यासह पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी ग्रामस्थांनी या ट्रक चालकास पोलिसांच्या स्वाधीन केलं. या अपघाताबद्दल मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

ऋतिक-प्रीतीची खास केमिस्ट्री थिएटरमध्ये पुन्हा अनुभवा; 20 वर्षपुर्तीनिमित्त चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार

तसेच या अपघातात मृत पावलेल्या तसेच गंभीर जखमी असलेल्या या महिलांचा गट सांगोल्यातील कटफळ येथील रहिवासी आहे. या महिला चिकमहूद या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतात मजुरीचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी काम संपल्यानंतर घरी जात असताना त्या पंढरपूर-कराड रोडवर एसटीच्या बसची वाट पाहत होत्या. त्याचवेळी या भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. त्यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जणी गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ माजली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube