Download App

पंकजा मुंडेंचं भविष्य रामदास आठवलेंनी सांगितलं; BRS प्रवेशाच्या चर्चांवर म्हणाले…

Ramdas Athawale on Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ही नाराजी त्यांनी अनेकदा अप्रत्यक्ष-प्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. या चर्चांमुळे त्यांना इतर पक्षांकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर दिल्या जातात. यापूर्वी त्या शिवसेना (UBT), राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात, असे बोलले जात होते. अशात नुकतेच तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी पंकजा मुंडे यांना बीआरएस पक्षात येण्याची आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होण्याची ऑफर दिली होती.

या ऑफरनंतर पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांचा पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, त्या नाराज नाहीत. पंकजा मुंडे बीआरएसमध्ये जाणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं. ते मंगळवारी अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. (ramdas-athawale-said-pankaja-munde-is-not-upset-brs-join-kcr)

शिंदे गटाला हायकोर्टाचा मोठा धक्का! ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण

मंत्री आठवले म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडेंचा पराभव करतील. त्यानंतर पंकजा मुंडे राजकारणात पुन्हा सक्रिय होतील. आज त्या आमदार असत्या तर त्या नक्कीच मंत्रीही असत्या असेही आठवले यांनी सांगितले.

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; खबरदारीचं आवाहन

पंकजा मुंडे बीआरएस पक्षात प्रवेश करणार नसल्याचा विश्वासही यावेळी मंत्री आठवले यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रामध्ये केसीआर यांना एवढं काही यश मिळणार नसल्याचेही यावेळी आठवले यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे आम्हाला त्याची काही भीती नाही, असंही यावेळी आठवले म्हणाले.

त्याचवेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी छगन भुजबळांना थेट आरपीआयमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये मराठा समाजातील नेत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ओबीसीला संधी मिळत नाही. ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. छगन भुजबळांचे प्रदेशाध्यक्षपदाची संधी द्यावी हे वक्तव्य हेच सिध्द करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठा समाजाच्या हातात आहे. शरद पवारांची भूमिका व्यापक असली तरी ओबीसी, दलित समाजाचा प्रतिनिधीत्व मिळत नसल्याचा टोलाही आठवले यांनी लगावला आहे.

त्याचबरोबर छगन भुजबळ नाराज असतील तर त्यांनी आरपीआयमध्ये यावे. त्यांना माझे निमंत्रण आहे. न्याय मिळत नसेल तर अन्याय सहन करू नका. मी आणि भुजबळ डॅशिंग नेते असल्याचे आठवले यांनी सांगितले आहे.

Tags

follow us